Health : वजन कमी करायचंय? 'ॲपल टी' अत्यंत फायदेशीर! कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यातही मोठी भूमिका, फायदे जाणून घ्या
Health : ॲपल टी... एक भारी मॉर्निंग ड्रिंक..! जी केवळ वजन कमी करण्यातच नाही तर कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यातही मोठी भूमिका बजावते.
![Health : वजन कमी करायचंय? 'ॲपल टी' अत्यंत फायदेशीर! कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यातही मोठी भूमिका, फायदे जाणून घ्या Health lifestyle marathi news Apple Tea beneficial for weight loss major role in controlling cholesterol high blood pressure know the benefits Health : वजन कमी करायचंय? 'ॲपल टी' अत्यंत फायदेशीर! कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यातही मोठी भूमिका, फायदे जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/dee8b1858d57fef4df93b3d48444bb161720344554284381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health : आजकाल आपण पाहतोय, बदलत्या जीवनशैलीत जो आरोग्याची योग्य काळजी घेतो, तोच खरा निरोगी, त्या व्यक्तीचे वजनही नियंत्रणात राहते, पण दुसरीकडे पाहिलं तर जे खराब जीवनशैली जगत आहेत. त्यातील प्रत्येक दुसरी व्यक्ती वाढत्या वजनाने त्रस्त झालेली दिसते. अशात आम्ही तुम्हाला अॅपल टी बद्दल सांगणार आहोत, जी केवळ वजन कमी करण्यातच नाही तर कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यातही मोठी भूमिका बजावते. त्यामुळे जराही विलंब न लावता हा चहा बनवण्याची पद्धत आणि त्यामुळे आरोग्याला होणारे अद्भुत फायदे जाणून घेऊया.
एक भारी मॉर्निंग ड्रिंक..!
जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी मॉर्निंग ड्रिंकच्या शोधात असाल तर आजचा लेख फक्त तुमच्यासाठी आहे. ॲपल टीने दिवसाची सुरुवात करून वजन कमी करण्यासोबतच तुम्हाला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. लवंग, दालचिनी आणि इतर काही मसाल्यांच्या साहाय्याने तयार केलेला हा सफरचंदाचा चहा म्हणजेच ॲपल टी प्यायला चवदार तर लागतोच पण वजन कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे. हा चहा कसा बनवाल? याची सोपी रेसिपी आणि त्याचे आरोग्य फायदे जाणून घ्या...
सफरचंद चहा बनवण्यासाठी साहित्य
सफरचंद- 1
दालचिनी पावडर - 1 चिमूटभर
लवंगा - 2
पाणी - 3 कप
लिंबाचा रस - 1 टेबलस्पून
टी बॅग - 2
सफरचंद चहा कसा बनवायचा?
सफरचंद चहा येथे दिलेल्या काही सोप्या स्टेप्सच्या मदतीने तुम्ही ते घरी सहज तयार करू शकता.
सर्व प्रथम एका पॅनमध्ये पाणी आणि लिंबाचा रस घाला.
यानंतर टी बॅग, लवंगा आणि दालचिनी घालून उकळू द्या.
नंतर सफरचंदाचे छोटे तुकडे करून चहाला पाच मिनिटे उकळू द्या.
मग तुमचा सफरचंद चहा तयार आहे. जर तुम्हाला ते मऊ प्यायचे नसेल तर तुम्ही त्यात मध देखील घालू शकता.
'ॲपल टी' प्यायल्याने 'हे' फायदे मिळतात
वजन कमी करण्यास उपयुक्त
सफरचंद चहाचे सेवन वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. यात खूप कमी कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढण्याची तक्रार नसते. याशिवाय त्यात फॅटचे प्रमाणही खूप कमी असते, त्याचा थेट परिणाम वजन कमी होण्यावर दिसून येतो.
कोलेस्ट्रॉल कमी करते
रोज सफरचंद चहाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते. यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स तुमच्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करतात.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर
सफरचंद चहाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. यात विरघळणारे फायबर भरपूर प्रमाणात असते, जे पचनशक्ती वाढवते.
मधुमेहामध्ये फायदेशीर
सफरचंदाचा चहा पिऊनही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते. या चहामुळे चयापचय संतुलन सुधारते, कारण त्यात अँटिऑक्सिडेंट तसेच फ्रुक्टोज असते, जी एक नैसर्गिक साखर आहे. सफरचंद चहाच्या मदतीने रक्तातील साखर अचानक वाढणे किंवा कमी होणे टाळता येते.
हेही वाचा>>>
Women Health : महिलांनो सतर्क राहा! Breast Cancer चे विविध टप्पे माहित आहेत? ते कशाप्रकारे शरीरात पसरतात? लक्षणं जाणून घ्या
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)