एक्स्प्लोर

हृदयाच्या आरोग्यावरही होतो बध्दकोष्ठतेचा परिणाम? खाण्यापिण्याच्या सवयींवर सारे काही, डॉक्टर सांगतात...

आतड्यांवर सतत ताण आल्याने रक्तदाबात होते वाढ - बध्दकोष्ठतेकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

मुंबई - दीर्घकालीन बद्धकोष्ठता ही केवळ तुमच्या पचनसंस्थेवरच परिणाम करते असे नाही तर ती तुनच्या हृदयावरही दबाव आणू शकते. हे विशेषतः वयोवृध्दांमध्ये किंवा आधीच हृदयरोग असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून येऊ शकते. म्हणूनच, कोणताही विलंब न करता बद्धकोष्ठतेचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

सध्या, मोठ्या संख्येने लोक बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करतात. हे खूपच चिंताजनक आणि लाजिरवाणे असू शकते. बद्धकोष्ठतेची लक्षणे म्हणजे आठवड्यातून तीनपेक्षा कमी मलविसर्जन करणे, कडक, कोरडे मल, मल विसर्जनास त्रास होणे किंवा वेदना होणे, पेट पूर्णपणे रिकामे झाल्यासारखे न वाटणे आणि पोट फुगणे किंवा अस्वस्थता जाणवणे. बद्धकोष्ठतेच्या कारणांमध्ये म्हणजे फायबरयुक्त आहाराचे प्रमाण कमी असणे, पाणी कमी पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, काही औषधे (जसे की वेदनाशामक किंवा अँटीडिप्रेसेंट्स), वेळीच मलविसर्जन न करणे आणि थायरॉईड समस्या, मधुमेह किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) यांचा समावेश आहे.

बध्दकोष्ठतेचा हृदयावर कसा परिणाम होतो?

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॅास्पीटलचे जनरल सर्जन डॉ. लक्ष्मण साळवे सांगतात की , लोकांना बद्धकोष्ठतेबद्दल चर्चा करण्यास अनेकदा लाज वाटते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये आतड्यांचे नुकसान, मूळव्याध आणि हृदयाचा धोका वाढणे यांचा समावेश आहे. आतड्यांचे आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. बद्धकोष्ठता ही अनेकदा किरकोळ पचन समस्या म्हणून नाकारली जाते, परंतु ती हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. आतड्यांवर सतत ताण आल्याने रक्तदाबात तात्पुरती पण धोकादायक वाढ होऊ शकते. हृदयरोगाचा वैद्यकिय इतिहास असलेल्या लोकांसाठी, यामुळे छातीत दुखणे, एरिथमिया किंवा क्वचित प्रसंगी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बद्धकोष्ठतेकडे कधीही दुर्लक्ष करू नये, विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा हृदयरोग असलेल्यांमध्ये ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. शौचास ताण देण्याच्या कृतीमुळे छातीवरील दाब वाढतो आणि हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे हे चिंतेचे कारण ठरु शकते.

डॉक्टरांचा सल्ला काय?

डॉ. साळवे पुढे सांगतात की, दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्या, फळे, भाज्या आणि तृणधान्यांना रोजच्या आहारात समावेश करा. उच्च फायबरयुक्त पदार्थ खा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा. मल रोखून ठेवणे टाळा आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर बद्धकोष्ठता एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली, विशेषतः छातीत दुखणे किंवा थकवा येत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नका.

झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले की, बद्धकोष्ठता आणि हृदयाच्या आरोग्यामध्ये एक परस्परसंबंध आहे. यामुळे केवळ आतड्यांनाच नव्हे तर तुमच्या हृदयालाही त्रास होतो. मलविसर्जन करताना ताण आल्याने छातीवरील दाब वाढू शकतो, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावर ताण येऊ शकतो. हृदयरोग असलेल्या लोकांमध्ये, यामुळे गंभीर गुंतागुत देखील होऊ शकते. म्हणून, विलंब न करता बद्धकोष्ठतेचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. बध्दकोष्ठतेचा सामना करण्यासाठी हायड्रेटेड रहा, अधिक फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करा, जास्त वेळ एका ठिकाणी बसणे टाळा आणि मल रोखुन धरु नका. नियमित शारीरिक हालचाली देखील मलविसर्जन क्रिया सुरळीत आणि नियमित राखण्यास मदत करतात.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Embed widget