Whey Protein Benefits: इम्युनिटी वाढवण्यापासून ते मसल्सना मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे व्हे प्रोटीन, जाणून घ्या याचे फायदे
Whey Protein: मसल्सना मजबूत करण्यासाठी, तणाव दूर करण्यासाठी आणि ब्लड शुगर नियंत्रणात राखण्यासाठी तुम्ही व्हे प्रोटीनचा वापर करू शकता. तसेच, वजन कमी करण्यासाठीसुद्धा व्हे प्रोटीन फायदेशीर आहे.
Whey Protein For Health : कोरोनाची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता आपल्या शरीराची काळजी घेणे फारच गरजेचे झाले आहे. जर तुम्ही तब्येतीने फिट असाल तर कोणत्याही आजारावर तुम्ही सहज मात करू शकता. शरीराला फिट आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रोटीनची फार गरज असते. प्रोटीनमुळे पेशींना मजबूती मिळते. तसेच, प्रोटीन वजन कमी करण्यासाठी आणि नियंत्रणात ठेवण्यासाठीही लाभदायक आहे. तुम्ही तुमच्या आहारात प्रोटीनचा वापरदेखील करू शकता. पण कित्येकदा जे लोक बॉडी बिल्डींग करतात, जिमला जाऊन एब्स बनवतात त्यांच्यासाठी प्रोटीन सप्लीमेंट्ससुद्धा मिळतात.
तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनबरोबर फॅट आणि फायबर्ससुद्धा मिळतात. बॉडी बनवणारे लोक फक्त प्रोटीनसाठी व्हे प्रोटीनला (Whey Protein) सप्लीमेंट म्हणून घेतात. प्रोटीन स्पलीमेट्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. परंतु, यामध्ये फायदेशीर आणि लोकप्रिय व्हे प्रोटीन (Whey protein)आहे. यामुळे तुमच्या मसल्स तर बनतातच पण तुमचं वजन कमी करण्यासाठीही मदत होते. जाणून घ्या व्हे प्रोटीनचे फायदे...
व्हे प्रोटीनचे फायदे -
1- अॅन्टीऑक्सीडेंटयुक्त व्हे प्रोटीन - व्हे प्रोटीन शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. हे शरीरातील अॅन्टीऑक्सीडेेंट फंक्शनला मजबूत करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी मदत करतात. व्हे प्रोटीनमुळे शराीरातील टॉक्सिन बार निघून जातात. तणावाचा सामना करण्यासाठी महत्वाचे एन्टीऑक्सीडेंट असतात. यामध्ये सर्वात महत्वाचे ग्लूटाथियोन अॅन्टीऑक्सीडेेंट असतात.
2 - वजन कमी करण्यास फायदेशीर-
तुम्हाला जर काही महिन्यातच वजन कमी करायचे असेल तर तुमच्या डाएटमध्ये व्हे प्रोटीनचा वापर नक्की करा. यामुळे वजन कमी करण्यासा मदत होते. व्हे प्रोटीनमुळे कॅलरीचे प्रमाण कमी होते तसेच मेटापॉलिझम वाढते. वर्कआऊट करणाऱ्या लोकांसाठी पेशींना मजबूत बनवण्याचे काम करतात. या व्यतिरिक्त निरोगी वजनासाठीही व्हे प्रोटीन आवश्यक आहे. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत आहात तर व्हे प्रोटीन वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
3- मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर -
मधुमेहाच्या रूग्णांसाठी काब्जचे (पिष्टमय पदार्थ ) कमी आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवण्यासाठी सल्ला दिला जातो. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये व्हे प्रोटीनचा वापर करू शकता. संशोधनात सुद्धा व्हे प्रोटीन इन्सुलिनच्या पातळीला वाढवून ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्हे प्रोटीन उपयुक्त असतात असं सिद्ध झालं आहे.
4- तणावापासून मिळवा मुक्तता -
व्हे प्रोटीमध्ये आवश्यक असे अमिनो अॅसिड असते. यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे क तत्व असते जे तुम्हाला चांगल्या झोपेसाठी फायदेशीर ठरतात. यामुळे मानसिक तणावसुद्धा कमी होतो. व्हे प्रोटीनमुळे शरीरात रोटोनिन उत्पन्न होते ज्यामुळे तणाव दूर करण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
हे ही वाचा :
- Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग 'ही' फळं खाणं टाळा
- Makar Sankranti 2022: तीळ आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या तिळाचे आश्चर्यकारक फायदे
- Brain Fog : ओमायक्रॉनमुक्त झालेल्यांना 'ब्रेन फॉग'चा धोका; लक्षणं आणि कारणं काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )