(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corn Recipe : मका आरोग्यासाठी फायदेशीर, 'या' झटपट रेसिपी ट्राय करा आणि आहारात समावेश
Corn Health Benefits : मका पचन आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. तुम्ही आहारात मक्याचा कोणत्या पद्धतींने समावेश करु शकता हे जाणून घ्या.
Corn Recipes : मका (Corn ) आरोग्यासाठी (Health Benefirts) अतिशय फायदेशीर असतो. मक्याच्या इवल्याशा दाण्यांचे अनेक फायदे आहेत. मका पचन आणि हृदयासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात अनेकदा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मका फायदेशीर ठरू शकते. मक्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, ज्यामुळे पचनाला मदत होते.
मका आरोग्यासाठी फायदेशीर
मका कोलेस्टेरॉल कमी करत हृदयाचं आरोग्य राखण्यातही खूप फायदेशीर आहे. याशिवाय डोळे आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठीही मका फायदेशीर आहे. त्यामुळे मक्याचा आहारात समावेश करणे अतिशय लाभदायक आहे. तुमही अनेक पद्धतींनी मक्याचा आहारात समावेश करु शकता. मक्यापासून पॉप कॉर्नशिवाय इतरही अनेक पदार्थ बनवता येतात. तुम्ही आहारात मक्याचा कोणत्या पद्धतींने समावेश करु शकता हे जाणून घ्या.
कॉर्न चाट
चाट खायला किती स्वादिष्ट असते, मग तुम्ही हेल्दी चाट रेसेपी नक्की ट्राय करु शकता. कॉर्न चाट खायला चविष्ट आणि आरोग्यदायीही आहे. उकडलेल्या मक्याच्या दाण्यांसोबत भोपळी मिरची, कांदा, टोमॅटो, चाट मसाला किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या आणि कोथिंबीर यासह एकत्र करून तुम्ही चाट तयार करु शकता. यामध्ये चिंचेची चटणी घालून तुम्ही ते चविष्ट बनवू शकता.
कॉर्न सूप
हिवाळ्यात गरमागरम सूप पिणं उत्तम असते. गरम सूपमुळे थंडीत शरीर उबदार राहण्यास मदत होते. मक्याच्या दाण्यांसोबत मसालेदार सूप पिण्याची मजा काही वेगळीच आहे.
हंडी कॉर्न
कॉर्न खाण्याचा हा एक मजेदार मार्ग असू शकतो. आंबट-गोड अशी हंडी कॉर्न भाजी तुम्ही खाऊ शकता. हंडी कॉर्न बनवण्यासाठी गरम मसाला, हळद, तिखट, धणे, लसूण, कांदा या सर्व मसाल्यांमध्ये गूळ आणि चिंच मिसळून एक अतिशय चवदार भाजी तयार करता येते.
कॉर्न टिक्की
कॉर्न टिक्की बनवायला अगदी सोप्या आणि खायला चविष्ट असतात. उकडलेल्या बटाट्यामध्ये कोथिंबीर आणि मसाले घालून उकडलेले कॉर्न मॅश करा. याच्या छोट्या टिक्की बनवून त्या तळून गरमागरम टिक्की दही आणि चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Chest Pain : छातीत दुखतंय? हार्ट अटॅक नाही 'हे' आजार असू शकतं कारण, वेळीच सावध व्हा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )