Salad and Soup : सूप पिताना किंवा सॅलड खाताना ही चूक करताय? होईल नुकसान
Soup and Salad : सॅलड खाताना किंवा सूप पिताना चुकीच्या पद्धतीनं सेवन केल्यास याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा वेळी कोणती काळजी घ्यायची ते जाणून घ्या.
Health Tips : बहुतेक जण निरोगी राहण्यासाठी योग्य जीवनशैली आणि व्यायाम करण्यासह पोषक आहाराचा समावेश करतात. पण हा पोषक आहार घेताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा याचा तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. सूप पिणं किंवा सॅलड खाणं आरोग्यासाठी फायदेशीप मानलं जातं, पण याचं सेवन योग्य प्रकारे करणं फार गरजेचं आहे.
सॅलड आणि सूपचं सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होतं. यामुळे तुमची पचनक्रिया आणि पचनसंस्था सुधारते. याशिवाय सॅलड तुमच्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतं. पण जर तुम्ही सॅलड आणि सूपचं सेवन चुकीच्या पद्धतीनं केलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. जाणून घ्या सॅलड आणि सूप यांचं चुकीच्या पद्धतीने सेवन केल्याने कशाप्रकारे नुकसान होऊ शकतं.
सॅलड आणि सूपचं जेवण म्हणून सेवन करणं टाळा.
दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात किंवा नाश्ता म्हणून फक्त सॅलड आणि सूपचं सेवन करणं टाळा. दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात किंवा नाश्त्यात तुम्ही सूप किंवा सॅलडचं सेवन करू शकता. तुम्ही इतर पदार्थांसोबत सॅलडचा समावेश करू शकता, पण नाश्ता किंवा जेवणाच्या वेळी फक्त सॅलड किंवा सूप यांचं सेवन करुन जेवण टाळण्याची चूक करु नका. कारण हा संतुलित आहार नाही. भात, डाळ, भाजी आणि चपातीला सॅलड किंवा सूप हा उत्तम पर्याय असू शकत नाही. आपल्या निरोगी शरीरासाठी संपूर्ण आहार घेणं खूप महत्वाचं आहे.
सॅलड किंवा सूप पिताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
- सूपमध्ये साखर किंवा बटर घालू नका. यामुळे शरीरातील चरबी वाढू शकते.
- हिरव्या भाज्या (Vegetables), बीन्स (Beans), चीज (Cheese) आणि अंडी (Egg) घालून सॅलड तयार करा. यामध्ये तेलाचा समावेश केल्यास कमी प्रमाणात करा..
- सॅलडवर लिंबाचा रस वापरल्यास अधिक लाभदायक ठरेल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : शरीरात वारंवार वेदना होतायत? 'ही' आजाराची लक्षणं असू शकतात
- Diabetes Care Tips : घराच्या घरी व्यायाम करा अन् मधुमेहावर नियंत्रण मिळवा! जाणून घ्या मधुमेहींसाठी मान्सून फिटनेस टिप्स
- Health Tips : झटपट वजन कमी करण्यासाठी खजूर फायदेशीर! जाणून घ्या खाण्याची पद्धत
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )