Corona JN.1 Variant : धोक्याची घंटा! JN.1 चा वाढता प्रसार भविष्यासाठी घातक, 40 हून अधिक देशांमध्ये पसरला नवीन व्हेरियंट
Covid-19 Update : कोरोना विषाणूचे JN.1 बदलेलं स्वरूप एक भीतीदायक आहे. जगभरात JN.1 अतिशय वेगाने पसरत असून हे भविष्यातील धोक्याचा अलर्ट असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Coronavirus JN.1 Variant Risk : नवीन वर्षात कोरोना (Covid-19) महामारीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. भारतातील दररोज कोविड-19 संसर्गाची प्रकरणे पुन्हा वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी कोरोना रुग्णांच्या 774 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला. देशात सध्या कोरोनाचे 4100 हून जास्त सक्रिय रुग्ण आहेत. ही आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असून ही बाब चिंताजनक आहे.
JN.1 व्हेरियंट भविष्यासाठी धोक्याची घंटा
सध्या जगासह देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा नवीन JN.1 सब-व्हेरिंयट वेगाने पसरताना दिसत आहे. नव्याने आढळण्याच्या रुग्णांमधील बहुतांश प्रकरणे JN.1 सब-व्हेरिंयटची असल्याने चिंता वाढली आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाचा JN.1 सब-व्हेरिंयट अतिशय वेगाने पसरणारा असला, तरी याची लक्षणे सौम्य आहेत आणि रुग्ण याच्या संसर्गातून लवकर बरे होते आहे. पण असं असलं तरी तज्ज्ञांनी याबाबत धोक्याचा इशारा दिला आहे.
जेएन.1 उपप्रकाराकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका, हे भविष्यासाठी धोकादायक संकेत असू शकतो, असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
JN.1 प्रकारामुळे चिंता वाढली
कोरोना विषाणू काळानुरुप स्वत:मध्ये बदल करत असल्याने जगभरातील शास्त्रज्ञांकडून जीनोम सीक्वेंन्सिंग आणि संशोधन सुरु आहे. कोरोनाचा अभ्यास करणार्या संशोधकांनी म्हटलं आहे की, लसीकरण आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळे आपल्या शरीराला कोविड-19 विषाणूची सवय झाली आहे. नवीन व्हेरियंटचा संसर्ग आणि गंभीर आजारांचा धोका आता लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, पण कोरोना विषाणूचे JN.1 बदलेलं स्वरूप एक भीतीदायक आहे. जगभरात JN.1 अतिशय वेगाने पसरत असून हे भविष्यातील धोक्याचा अलर्ट असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
JN.1 व्हेरियंटचे गंभीर परिणाम
कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटचे दोन गंभीर परिणाम होऊ शकतात. पहिलं म्हणजे कोरोना महामारीविरुद्धचा लढा आपल्याला संपवता येणार नसून हा लढा आपल्याचा दीर्घकाळ सुरू ठेवावा लागेल. तर, दुसरा परिणाम म्हणजे JN.1 व्हेरियंटचा प्रसार भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य धोकादायक नवीन कोविड व्हेरियंटसाठी अनुकूल वातावरण तयार करू शकतो आणि हे मानवासाठी घातक ठरू शकतं.
तज्ज्ञांनी काय सांगितलं?
मिनेसोटा विद्यापीठातील सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीज रिसर्च अँड पॉलिसी (CIDRAP) चे संचालक डॉ. मायकेल ऑस्टरहोम यांच्या मते, उच्च संक्रमणक्षमतेचा प्रकार कोरोना संक्रमण वाढवण्यासोबतच विषाणूमधील नवीन बदलांसह अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक व्हेरियंटना जन्म देऊ शकतो. कोरोना महामारीच्या सुरूवातीला कोविड विषाणूच्या अल्फा आणि गामा या व्हेरियंटच्या पहिल्या लाटेमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली, पण त्याचा प्रसार खूप जास्त होता. त्यामुळे त्यानंतर कोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराचा उदय झाला आणि डेल्टा व्हेरियंट जगभरातील मृत्यूंमध्ये झपाट्याने वाढ झाली. JN.1 प्रकाराचे जलद गतीने होणारा संसर्गानंतर येणाऱ्या संभाव्य व्हेरियंटबाबतीतही अशी शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Coronavirus : कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटपासून लहान मुलांचं संरक्षण कसं कराल? वृद्धांनाही धोका जास्त; वाचा सविस्तर
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )