Covid-19 JN1 : देशात पुन्हा वाढला कोरोनाचा धोका, 'या' आयुर्वेदिक उपायांनी स्वतःचा बचाव करा
Coronavirus New Variant : देशात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. काही आयुर्वेदिक उपायांनी तुम्ही स्वतःचा बचाव करु शकता.
Corona New JN1 Variant : देशात पुन्हा कोरोनाचा (Corona) कहर वाढताना दिसत आहे. कोविडचा नवीन प्रकार झपाट्याने पसरत आहे. कोविड विषाणू (Covid-19 Virus) आजारी आणि वृद्धांसाठी गंभीर ठरू शकतो. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे काही जणांचा मृत्यूही झाला आहे. केरळमध्ये या आठवड्याता कोरोना रुग्णाचा 20 हजारांचा आकडा पार होणार आहे. अशा परिस्थिती आयुर्वेदिक उपाय करुन तुम्ही स्वतःचं संरक्षण करु शकता, कसं ते जाणून घ्या.
मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश मिळवा
हिवाळ्यात आपल्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर अनेक आजारही उद्भवतात. हेच कारण आहे की, हिवाळ्यात लोक जास्त आजारी पडतात. सूर्यप्रकाश एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. फक्त 10 ते 15 मिनिटांच्या सूर्यप्रकाशामुळे मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. सूर्यप्रकाश अनेक आजारांपासून तुमचं रक्षण करतो. सूर्यप्रकाश घेतल्याने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. त्यामुळे बीपी आणि वजनही नियंत्रित राहते. सूर्यप्रकाशातून आपल्याला ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. खाली दिलेले उपाय करुन तुम्ही आयुर्वेदिक उपाय करुन स्वत:चं संरक्षण करु शकता.
प्रतिकारशक्ती वाढवा
- व्हिटॅमिन सी साठी लिंबूवर्गीय फळे खा
- व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी काही वेळ उन्हात बसा
- हिरव्या भाज्या खा
- हळदीचे दूध प्या
- फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी प्राणायाम करा
- घराबाहेर पडताना मास्क वापरा
फुफ्फुस मजबूत करा
- रोज प्राणायाम करा
- गरम पाणी प्या, थंड पाणी पिऊ नका
- तुळस उकळून ते पाणी प्या
- दही आणि ताक खाऊ नये
- तळलेले अन्न टाळा
कोरोनाचा नवा सब-व्हेरियंट JN1
केरळमध्ये कोरोनाचे सब-व्हेरियंट JN.1 चं प्रकरण समोर आल्यानंतर कर्नाटक आणि तामिळनाडू ही शेजारील राज्य सतर्क झाली आहेत. त्याचबरोबर केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये (Kerala) आढळून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं (Union Ministry of Health) याबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनानं ग्रस्त असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं वृत्तही समोर येत आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Coronavirus Update : कोरोनाच्या JN1 व्हेरियंटमुळे डोकेदुखी वाढली! मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका प्रशासन सतर्क
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )