एक्स्प्लोर

Coronavirus : चिंताजनक! देशात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, 24 तासात 656 नवे रुग्ण; 3742 सक्रिय कोरोनाबाधित

Covid-19 Cases : कोरोनामुळे टेन्शन वाढलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एकूण 3,742 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Coronavirus Update in India : देशात पुन्हा एकदा कोरोनामुळे डोकेदुकी वाढली आहे. भारतात (India) रविवारी कोरोनाचे (Corona Update) 656 नवीन रुग्ण आढळून आले असून एका कोरोना रुग्णाचा मृत्यू (Corona Patient Death) झाला आहे. ही आकडेवारी गेल्या 24 तासांची आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) आकडेवारीनुसार, देशात सध्या एकूण 3,742 सक्रिय कोरोना रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 128 नवीन कोरोनाबाधित आढळले असून कर्नाटकात 96 रुग्णांची नोंद झाली आहे.

कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच

गेल्या काही आठवड्यांपासून भारतात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. JN.1 या कोरोनाच्या नवीन सब-व्हेरियंटने भारताचीच नाही तर जगाची चिंता वाढवली आहे. कोरोना विषाणूच्या नव्या JN.1 प्रकाराबाबत सरकारने धोक्याचा इशारा दिला आहे. भारताव्यतिरिक्त सिंगापूर आणि इंग्लंडसारख्या देशांमध्येही हा नवीन प्रकार आढळून आला आहे. दरम्यान, कोरोनाचा JN.1 सब-व्हेरियंट ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे. यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र, या व्हेरियंटची लक्षण सौम्य असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

कोरोनामुळे टेन्शन वाढलं

  • गेल्या 24 तासात देशात 656 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. 
  • एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू .
  • देशात एकूण 3,742 लोकांना कोरोनाची लागण
  • केरळ आणि कर्नाटकमध्ये रुग्णांची सर्वाधिक संख्या
  • सरकारकडून नवीन सब-व्हेरियंटबाबच JN.1 बद्दल धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचाही इशारा

गेल्या एका महिन्यात जगभरात कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी ही माहिती दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या अहवालात म्हटलं आहे की, 20 नोव्हेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान कोरोनाच्या एकूण 8,50,000 हून अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. दरम्यान, जगभरात गेल्या 28 दिवसांच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये 8 टक्क्यांची घट झाली आहे, यामध्ये 3,000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहेत.

'या' राज्यात आढळले कोरोनाचे रुग्ण

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबरपासून ठाणे शहरात 20 रुग्णांचे नमुने घेण्यात आले, त्यापैकी जेएन.1 प्रकाराचे 5 रुग्ण आढळले आहेत. ठाण्यात सध्या कोरोनाचे 27 सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राशिवाय कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोव्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget