Health Tips : बडीशेप आणि साखर खाण्याचे अनके फायदे; हिमोग्लोबिन वाढेल, दृष्टीही सुधारेल
Fennel And Mishri Benefits : माउथ फ्रेशनर म्हणून दिली जाणारी बडीशेप आणि साखर खाल्ल्याने दृष्टी सुधारते. त्यामुळे पोट आणि पचनाशी संबंधित समस्या दूर होतात तसेच शरीरातील हिमोग्लोबिनही वाढते.
Saunf And Mishri Benefits : अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा बडीशेप आणि साखर खायला दिली जाते. हे एका चांगल्या माउथ फ्रेशनरसारखे काम करते, परंतु तुम्हाला बडीशेप आणि साखर खाण्याचे आरोग्यासाठी होणारे अनेक फायदे माहित आहेत का? बडीशेप आणि साखर खाल्ल्याने तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहाल. यामध्ये झिंक, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट्स, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते. उन्हाळ्यात बडीशेप आणि साखर खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो. या दोन्ही गोष्टी डोळ्यांसाठीही वरदान आहेत. जाणून घ्या बडीशेप आणि साखर खाण्याचे काय फायदे आहेत?
1. पचनक्रिया मजबूत होते
बडीशेप आणि साखर खाल्ल्याने तोंडात ताजेपणा तर येतोच तसेच अन्न पचायलाही मदत होते. बडीशेपमध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात, ज्यामुळे पचनक्रिया लगेच सक्रिय होते. बडीशेप आणि साखर खाल्ल्यानंतर अन्नपचन जलद होते.
2. हिमोग्लोबिन वाढते
जर तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर तुम्ही बडीशेप आणि साखर खावी. यामुळे शरीरातील लोहाची कमतरता दूर होते. बडीशेप आणि साखर खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि शरीरातील रक्तप्रवाहही सुधारतो.
3. डोळ्यांसाठी फायदेशीर
बडीशेप आणि साखर खाल्ल्याने डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात. यामुळे दृष्टी सुधारते. बडीशेप आणि साखर एकत्र खाल्ल्यास तुमची दृष्टी सुधारेल. यामुळे तुमचा चष्म्याचा नंबर कमी होण्यासही मदत होईल.
4. खोकला आणि सर्दीपासून आराम
जर तुम्हाला खोकला आणि घसादुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही बडीशेप आणि साखर खावी. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म तुम्हाला सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात.
5. तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
जेवणानंतर तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर तुम्ही माऊथफ्रेशनर म्हणून बडीशेप आणि साखर खाऊ शकता. त्यामुळे तोंडाला वास येणार नाही. बडीशेप आणि साखर खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी दूर होते. हे तोंडाची पीएच पातळी (ph Level) राखण्यासाठी देखील मदत होते आणि बॅक्टेरिया दूर ठेवते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
-
Ajwain Use In Summer : उन्हाळ्यात ओवा खाण्याचे फायदे, जाणून घ्या
-
Health Tips : यकृतासाठी या 5 गोष्टी आहेत वरदान; रक्तही होईल स्वच्छ
- Hiccup : पुरेसे पाणी पिऊनही वारंवार उचकी का येते? जाणून घ्या कारणे आणि उपाय
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )