एक्स्प्लोर

Beer Side Effects : बीअर प्यायल्याने होतात हे 5 धोकादायक आजार, वेळीच आवरलं नाही तर जगणंही होईल मुश्किल

Health Tips: काही लोकांना कधीतरी बीअर प्यायची सवय असते, तर काहींना रोज प्यायची सवय असते. पण त्यामुळे शरीरावर मात्र गंभीर परिणाम होतात.

Beer Side Effects : आजकाल बीअर पिणे म्हणजे फॅशन झाली आहे. बीअर न पिणारा व्यक्ती वा तरूण म्हणजे मॉडर्न नसल्याचं समजलं जातंय, म्हणजे तसा काही लोकांचा समज असतो. काही लोकांना दररोज बिअर पिणे आवडते, तर काहीजण हे कधीतरी त्या वाटेला जातात. पण बीअर पिणे हे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

जर तुम्ही दररोज बिअर पीत असाल तर काळजी घ्या, कारण त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आजकाल बिअर पिण्याचा ट्रेंड वाढत असल्याने त्याचे काय नुकसान होऊ शकते हे नकळत लोक त्याकडे आकर्षित होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बिअर तुम्हाला काही काळ तणावमुक्त करते, पण दीर्घकाळात ती तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आजारही देते. तुम्हालाही बिअरचे व्यसन असेल तर येथे जाणून घ्या त्यामुळे होणारे 5 गंभीर नुकसान,

1. वजन झपाट्याने वाढेल

बीअरमध्ये भरपूर कॅलरीज असतात. ते रोज सेवन केल्यावर भरपूर कॅलरीज शरीरात पोहोचतात. त्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे वजन वाढू शकते. याशिवाय ती प्यायल्याने भूकही वाढते आणि ते हानिकारक ठरू शकते.

2. यकृतासाठी धोकादायक

बीअरमुळे यकृतालाही हानी पोहोचू शकते. वास्तविक यकृत अल्कोहोलचे चयापचय करते. पण ते शरीरासाठी हानिकारक असू शकते. जास्त काळ दारू आणि बीअर प्यायल्याने यकृताला सूज येणे, फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस सारखे घातक आजार होऊ शकतात. यामुळे यकृताचेही नुकसान होऊ शकते.

3. कर्करोगाची कारणे

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) ने अनेक अभ्यासात दाखवून दिले आहे की अल्कोहोल आणि बीअर देखील काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका वाढवते. यामुळे तोंड, यकृत, स्तन आणि घशाचा कर्करोग होऊ शकतो. सप्टेंबर 2021 मध्ये न्यूट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले होते की मद्यपान केल्याने पाचन तंत्राचा कर्करोग म्हणजेच कोलोरेक्टल कर्करोग देखील वाढू शकतो.

4. हृदयरोग

काही अभ्यासात असे आढळून आले आहे की अल्कोहोलचे जास्त सेवनामुळे हृदयाच्या समस्या वाढवू शकते. जर बीअर जास्त प्रमाणात घेतली गेली तर त्याचे घातक परिणाम होऊ शकतात. यामुळे उच्च रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड वाढू शकतात. हृदयासाठी अनेक धोके उद्भवू शकतात.

5. मॅग्नेशियम-ब जीवनसत्त्वाची कमतरता

बीअर आणि वाईनमध्ये कोणतेही पोषक तत्व नसतात. मात्र त्याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक पोषक तत्वे नष्ट होतात. त्यामुळे मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी चे प्रमाण कमी होऊ लागते. फॉलिक ॲसिड आणि झिंक देखील नष्ट होऊ शकतात, जे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra LIVE Superfast News : 5.30 PM : बातम्यांचा वेगवान आढावा : 04 DEC 2025 : ABP Majha
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
Kishori Pednekar on Nashik : साधुसंतांना पुढे करून वृक्षतोड करणार असाल, तर कोणी सहन करणार नाही
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Sanjay Shirsat On Mahayuti And Ravindra Chavan:...तर स्वतंत्र लढू; शिवसेना शिंदे गटाचा भाजपाला इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 डिसेंबर 2025 | गुरुवार
Hardik Pandya : हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, गुजरात विरुद्धच्या मॅचचं ठिकाण बदलावं लागलं, आता पांड्याची SMAT मधून एक्झिट, कारण समोर
हार्दिक पांड्याला पाहण्यासाठी तुफान गर्दी, आयोजकांवर सामन्याचं ठिकाण बदलण्याची वेळ, काय घडलं?
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Video: पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? सुप्रिया सुळेंच्या प्रश्नांवर मंत्री गडकरींनी कालावधी सांगितला!
Putin India Visit : नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, भारताला त्यांचा अभिमान असला पाहिजे, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून मोदींचं कौतुक
नरेंद्र मोदी दबावात येणारे नेते नाहीत, व्लादिमीर पुतिन यांच्याकडून भारत दौऱ्यापूर्वी मोदींचं कौतुक  
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
धक्कादायक! विधानसभा, लोकसभेला मतदान केलं, आता मतदार यादीतून माजी नगरसेवकाचंच नाव वगळलं
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
सदा सरवणकरांच्या लेकाचं मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत लग्न; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आशीर्वाद
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
Video: तब्बल 80 हजारांवर बघ्यांचा जमाव, 13 वर्षाच्या मुलाच्या हातात बंदूक अन् घरातील 13 जणांच्या हत्येचा बदला हत्येनं! बंदुकीचा 'न्याय' बघायला देशाचे सरन्यायाधीश सुद्धा आले..
Embed widget