Skin Care : सुंदर, चमकदार त्वचेसाठी बिअरचा 'असा' करा वापर
Beer For Skin Care : बिअर पिणं आरोग्यासाठी जरी हानिकारक असलं तरी ही त्वचेसाठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कसं ते जाणून घ्या.
Beer Benefits For Skin : आपली त्वचा (Skin) सुंदर आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सुंदर आणि नितळ त्वचा (Spotless Glowing Skin) मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही जण घरगुती उपाय करुन पाहतात, तर काही जण महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरतात. मात्र प्रत्येकाला पाहिजे ते परिणाम मिळतात, असं नाही. तुम्हालाही जर सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल तर तुम्ही बिअरचा (Beer) वापर करुन पाहा. हो तुम्ही बरोबर वाचलंय. बिअर पिणं आरोग्यासाठी जरी हानिकारक असलं तरी ही त्वचेसाठी आणि केसांसाठी (Beer For Hair Care) अतिशय फायदेशीर आहे. बिअरबनवण्यासाठी होप्स या फुलाचा वापर केला जातो. या फुलामध्ये अँटी-बॅक्टीरियल, अँटी-इंफ्लिमेंटरी, अँटी-ऑक्सीडेटिव्ह, अँटी-मॅलानोजेनिक सारखे गुण असते. त्वचेसाठी आणि केसांसाठी बिअर कशी फायदेशीर आहे ते जाणून घ्या.
त्वचेवर बिअर लावण्याचे फायदे (Beer For Skin Care)
1. त्वचेवर बिअर लावल्याने बॅक्टेरियाचं संक्रमण कमी होतं, त्यामुळे मुरुमांची समस्या दूर होते.
2. बिअर मृत त्वचा काढण्यास मदत करते. युरोपियन अकादमी ऑफ डर्मेटोलॉजी अँड वेनेरिओलॉजीच्या संशोधनानुसार, बिअरमध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे मृत पेशी काढून टाकते.
3. दररोज त्वचेवर बिअर लावल्याने त्वचा चमकदार बनते. बिअरमध्ये हायड्रोक्विनोन नावाचा पदार्थ असतो, जो हायपरपिग्मेंटेशन कमी करण्यास मदत करतो.
त्वचेवर बिअर कशी लावायची?
1. बिअर आणि खोबरेल तेल : तुम्ही एक चमचा बिअरमध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळा. हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
2. बिअर आणि संत्र्याचा रस : तुम्ही संत्र्याचा रस आणि बिअर मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी अर्धा कप बिअरमध्ये दोन चमचे संत्र्याचा रस मिसळा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. हे कोरडे झाल्यावर त्यावर आणखी एक थर लावा. 20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
3. बिअर आणि स्ट्रॉबेरी : तुम्ही बिअर आणि स्ट्रॉबेरीपासून फेस पॅक बनवूनही वापरू शकता. यासाठी तीन स्ट्रॉबेरी मॅश म्हणजे कुस्करून घ्या आणि त्यात एक टीस्पून बिअर मिसळा. आता हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. साधारण 20 मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या इतर बातम्या :
- Weight Loss : रात्रीच्या जेवणात 'या' पदार्थांचं करा सेवन, पोट भरेल आणि वजनही कमी होईल
- Hare Care : सुंदर आणि मजबूत केस मिळवण्याचा सोपा मार्ग, वाचा सविस्तर माहिती
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )