Avoid Antibiotics : हलका ताप असल्यास अँटिबायोटिक औषध देणं टाळा, आयसीएमआरच्या डॉक्टरांना सूचना
Avoid Antibiotics for Low Fever : इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) डॉक्टरांना हलका ताप आणि व्हायरल ब्राँकायटिस यासारख्या आजारांसाठी अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळण्याचं आवाहन केलं आहे.
Avoid Antibiotics for Low Fever : इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) डॉक्टरांना हलका ताप (Low Fever) आणि व्हायरल ब्राँकायटिस (Viral Bronchitis) यासारख्या आजारांसाठी अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळण्याचं आवाहन केलं आहे. यासंदर्भात ICMR ने शनिवारी नव्याने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार, आरोग्य संशोधन एजन्सीनं डॉक्टरांना अँटिबायोटिक लिहून देताना काही नव्या नियमांचं पालन करण्याचा सल्ला दिला आहे.
सौम्य ताप असल्यास अँटिबायोटिक औषधांचा वापर टाळा
ICMR ने नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सांगितलं आहे की, जोपर्यंत गंभीर आजारासारखी परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत अँटिबायोटिक्स टाळण्याचा प्रयत्न करा. आयसीएमआरने यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये अँटिबायोटिक औषधांचा वापर कुठे करावा आणि कुठे नाही रितसरपणे सांगण्यात आलं आहे. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये डॉक्टरांना कोणत्या आधारावर अँटिबायोटिक औषधांचा वापर करावा याबद्दल सांगण्यात आलं आहे.
Target bacteria with as narrow spectrum antibiotics as possible, contribute to reducing antibiotic resistance!#AntimicrobialResistance #AMR #WAAW2022 @MoHFW_INDIA @DeptHealthRes @KaminiWalia @drlokeshksharma pic.twitter.com/tOPEFMtBje
— ICMR (@ICMRDELHI) November 24, 2022
ICMRच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्वचा आणि टिश्यू इन्फेक्शनसाठी अँटिबायोटिक औषधांचा वापर पाच दिवस, व्हायरल न्यूमोनियासाठी अँटिबायोटिक औषधांचा डोस पाच दिवस आणि जर न्यूमोनियाचा रुग्ण रुग्णालयात दाखल असेल, तर अशा रुग्णाला अँटिबायोटिक औषधांचा डोस आठ दिवसांसाठी द्यावा.
1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान केलेल्या ICMR ने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की, भारतातील मोठ्या प्रमाणातील रुग्णांना कार्बापेनेम्स अँटिबायोटिकचा (Carbapenems) फायदा होत नाही. अनेक रुग्णांवर कार्बापेनेम्स अँटिबायोटिक परिणामकारक ठरत नाही. कार्बापेनेम्स अँटिबायोटिक प्रामुख्याने न्यूमोनिया आणि सेप्टिसीमिया इत्यादींच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारं औषध आहे. या औषधाचा वापर सरसकट न्यूमोनियाच्या रुग्णांवर करण्यात येत होता. मात्र, हे बहुतेक रुग्णांवर प्रभावी ठरत नसल्याने आयसीएमआरने रुग्णाच्या स्थितीवर आधारित अँटिबायोटिक औषधाचा डौस रुग्णाला द्यावा की नाही हे ठरवावं, अशा सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत.
सामान्यपणे, अँटिबायोटिक औषधांचा वापर सेप्सिस आणि सेप्टिक शॉक, व्हायरल न्यूमोनिया, व्हेंटिलेटर-संबंधित न्यूमोनिया आणि नेक्रोटाइझिंग फॅसिटायटिसने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी केला जातो. दरम्यान, डॉक्टरांनी रुग्णांसाठी फायदेशीर ठरेल असा औषधांचा डोस तयार करण्याचा प्रयत्न करावा. कारण सर्व अँटिबायोटिक औषधांचा रुग्णावर प्रभावी परिणाम होत असं नाही, असं आयसीएमआरने सुचवलं आहे.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )