Research Updates: तुमचा बॉस सारखी चिडचिड करतो, मग त्याच्यावर वैतागू नका, त्याला 'थँक्यू' म्हणा; कारण जाणून घ्या
Research Updates: रागीट बॉसच्या हाताखाली काम केल्यामुळे आपल्या कलागुणांना अधिक वाव मिळतो आणि आपलं काम उत्तमरित्या करुन दाखवण्यास प्रेरणा मिळते, असं रिसर्चमधून समोर आलं आहे.
Angry Boss Uncovering Hidden Talents: अनेकजण म्हणतात की, आपला बॉस (Angry Boss) जर रागिष्ठ असेल तर, ऑफिसमधलं वातावरण (Office Environment) अत्यंत खराब होतं. कोणालाही काम करण्याची इच्छा होत नाही, ना ऑफिसमध्ये जावंसं वाटतं. लोक म्हणतात की, ज्या बॉसला जास्त राग येतो (How To Work With Your Angry Boss), ते कामाचं वातावरण खराब करतात. पण नुकत्याच आलेल्या एका रिसर्चनं ही बाब पूर्णपणे चुकीची ठरवली आहे. जर तुमचा बॉस रागीट असेल, तर एम्प्लॉयीसाठी ते उत्तम ठरतं, असं रिसर्चमधून समोर आलं आहे. रागीट बॉसमुळे आपल्यातलं लपलेलं टॅलेन्ट बाहेर येतं. तसेच, एम्प्लॉयीच्या कलागुणांना वाव मिळतो, असा निष्कर्ष रिसर्चमधून समोर आला आहे.
एका रागीट बॉसच्या हाताखाली काम केल्यामुळे त्यानं दिलेली आव्हानं तुम्हाला तुमच्या कामात आणखी उत्तम करण्यासाठी मदत करतात. रागीट बॉसच्या हाताखाली काम केल्यामुळे आपल्या कलागुणांना अधिक वाव मिळतो आणि आपलं काम उत्तमरित्या करुन दाखवण्यास प्रेरणा मिळते, असं रिसर्चमधून समोर आलं आहे. कठोर परिश्रम आणि आव्हानं खरोखरच आपल्याला सुधारण्यात मदत करू शकतात? जाणून घेऊयात, रिसर्च नेमकं काय सांगतो...
संशोधनात नेमकं काय म्हटलंय?
स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर जेफ्री यांनी केलेल्या संशोधनात असं दिसून आलं आहे की, ऑफिसमध्ये अधूनमधून राग दाखवणं चांगलं असतं. यावरून असं दिसून येतं की, बॉसला कामाबाबत चिंता असते, आणि कर्मचाऱ्यांनाही त्याबाबत सतत सावध केलं जातं. योग्य वेळी थोडासा राग दाखवल्यानं टीमचा उत्साह आणि जोश वाढू शकतो. यामुळे बॉसची ताकद आणि दृढनिश्चय देखील एम्प्लॉयीसमोर येतो. जर राग विचारपूर्वक आणि थोडासा दाखवला, तर तो कार्यालयातील वातावरण जागरूक आणि स्पर्धात्मक बनवू शकतो, असं रिसर्चमधून समोर आलं आहे.
रिसर्च नेमकं काय सांगतो?
मानसशास्त्राच्या जगात व्यक्तिमत्त्वाचे पाच मुख्य गुण आहेत आणि यापैकी एक गुण म्हणजे 'सहमती'. सहमत असे लोक असतात, जे इतरांसोबत चांगलं काम करतात आणि त्याहीपेक्षा सर्वांशी नम्रतेनं वागतात. तसेच, जे लोक सहजासहजी सहमत नाहीत, त्यांच्यात टीकात्मक वृत्ती असते आणि ते लढण्यास तयार असतात.
बॉसच्या रागामुळे चांगलं काम होतं
ॲमस्टरडॅम विद्यापीठात या विषयावर एक रिसर्च करण्यात आला. या संशोधनात सहमत आणि असहमत व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकांना वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवण्यात आलं आणि त्यांच्या कामाला दोन वेगवेगळ्या प्रकारे अभिप्राय देण्यात आला. एक प्रतिक्रिया आनंदानं आणि कौतुकानं भरलेली होती, तर दुसरी प्रतिक्रिया राग आणि संतापानं भरलेली होती. रिसर्चमधून असा निष्कर्ष काढला की, जेव्हा असहमत असलेल्या लोकांच्या गटाला संतप्त प्रतिक्रिया मिळाल्या, तेव्हा त्यांची कामगिरी सुधारली. त्यांना काहीतरी सिद्ध करण्याची गरज आहे, असं त्यांना वाटलं आणि यामुळे त्याला अधिक मेहनत करण्यास प्रवृत्त झालं. पण संतप्त प्रतिक्रियेचा उलट परिणाम मान्य करणाऱ्या लोकांच्या गटावर झाला. यामुळे ते निराश झाले आणि त्यांची कामगिरी कमकुवत झाली.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )