Health Tips : जेवणानंतर तोंड स्वच्छ धुणं गरजेचं; अन्यथा 'हे' गंभीर आजार होण्याची शक्यता
Health Tips : जेवल्यानंतर तोंड स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे कारण याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
Health Tips : अनेकांना जेवणानंतर तोंड न धुण्याची, चूळ न भरण्याची सवय असते. पण, ही सवय तुमच्या आरोग्यासाठी (Health) फार घातक ठरू शकते. जेवल्यानंतर तोंड स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे कारण याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जेवणानंतर तोंड स्वच्छ न धुतल्याने आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो? किंवा असं करणं महत्वाचे का आहे? तर, हे महत्वाचे आहे कारण ही सवय तुमचे अनेक रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करेल. जेवल्यानंतर प्रत्येक वेळी तोंड स्वच्छ केल्याने तुम्ही अनेक आजार टाळू शकाल. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
...यासाठी जेवणानंतर तोंड स्वच्छ धुणे गरजेचं
दातांचा वरचा थर निघून जातो
आपण काहीही खातो किंवा पितो तेव्हा ते आपल्या दातांच्या वरच्या थराला चिकटते. यामध्ये अनेक जंतू असतात. हे जंतू जर तुमच्या दातांवर तसेच राहिले तर काही काळाने दुर्गंधी पसरते आणि यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळू शकतं.
दात किडू शकतात
तुम्ही जेवणानंतर तोंड धुणे खूप महत्वाचे आहे. कारण यामुळे दात किडण्याची शक्यता सर्वात जास्त असते. खरंतर, अन्न खाल्ल्यानंतर तुमच्या दातांवर बॅक्टेरिया जमा होतात. यामुळे दात किडतात. त्यानंतर तीव्र दातदुखी सुरू होते. त्यामुळे दात पूर्णपणे खराब होऊ लागतात. यामुळे दात आतून पोकळ होऊ लागतात.
तोंडाला संसर्ग होण्याचा धोका असतो
जेवल्यानंतर तोंड स्वच्छ न केल्यास अनेक प्रकारचे तोंडाचे संसर्ग निर्माण होऊ शकतात. खरंतर, अन्न आणि त्यात मिसळलेले बॅक्टेरिया दातांवर संक्रमण करतात. त्यामुळे तोंडात फोड येऊ लागतात आणि जीभेवरही पुरळ उठतात. म्हणून, झोपण्यापूर्वी तुम्ही नेहमी तोंड स्वच्छ धुणं गरजेचं आहे यामुळे तोंडाला दुर्गंधी येत नाही.
तुम्हाला देखील या समस्यांचा सामना करायचा नसेल तर जेवणानंतर वेळीच तोंड आणि हात स्वच्छ धुण्याची सवय लावून घ्या. जेवणानंतर साधारण 3 ते 5 मिनिटांनी आपलं तोंड स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसेच, दिवसातून दोनदा ब्रश करण्याची सवयही लावून घेणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :