Health Tips : पेरूच्या पानांमुळे लठ्ठपणा होतो कमी, जाणून घ्या याचे अन्य फायदे
Health Tips : तुम्हालाही पटकन वजन कमी करायचे आहे ? पेरूच्या पानांचा वजन कमी करण्यासाठी चांगला उपयोग होतो.
Health Tips : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण शारीरिक तंदुरूस्त नसतात. वाढत्या वजनामुळे बहुतेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा स्थितीत प्रत्येकाला वजन कमी करायचे असते, त्यासाठी बरेच लोक जिममध्ये जातात आणि काही लोक घरी व्यायाम करतात. परंतु, फक्त व्यायामाने सर्व काही होत नाही. तर, वजन कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे देखील खूप महत्वाचे आहे. इतकंच नाही तर, लोक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करतात जसे की वजन कमी करण्याची औषधे इ. ते अनेक प्रकारचे नुकसान करतात. अशा वेळी पेरूची पाने वजन कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. पेरूच्या पानांचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात.
पेरूच्या पानांमध्ये काय होते?
पेरूची पाने कॅलरी फ्री असतात, त्यामुळे ते वजन कमी करण्यात प्रभावी ठरतात. कारण पेरूची पाने खाल्ल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे वाटते. जेवणात पेरूची पाने चांगली दिसतात, परंतु जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्याचा रस बनवून पिऊ शकता. पेरूमध्ये कॅलरी फ्री आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
पेरूच्या पानांचे फायदे :
1 - पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आढळतात, जे शरीराला गॅस्ट्रिक अल्सरपासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे जर तुम्हाला गॅस्ट्रिक अल्सरचा त्रास होत असेल तर तुम्ही पेरूच्या पानांचे सेवन अवश्य करा.
2 - पेरूच्या पानांमध्ये अनेक घटक असतात जे अतिसार किंवा जुलाबात फायदेशीर ठरतात.
3 - जर तुम्हाला खोकला, खाज सुटणे इत्यादी त्रास होत असेल तर तुम्ही पेरूच्या पानांचे सेवन करावे, कारण त्यामध्ये अँटी-एलर्जिक गुणधर्म असतात ज्यामुळे शरीराला आराम मिळतो.
4 - पेरूच्या पानांमध्ये असे अनेक घटक असतात जे शरीराला कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. इतकेच नाही तर शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराच्या समस्याही दूर ठेवतात.
5 - मधुमेहाने त्रस्त असलेल्या व्यक्तीला रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची समस्या नेहमीच असते. अशा परिस्थितीत पेरूच्या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीराला त्रासापासून दूर ठेवते. अशा स्थितीत पेरूच्या पानांचा रस पिणे सर्वात महत्त्वाचे आहे, तेही सकाळी रिकाम्या पोटी, तरच ते गुणकारी असल्याचे सिद्ध होते.
6 - पेरूच्या पानांमध्ये असे अनेक घटक असतात जे पोटाच्या सर्व समस्या दूर ठेवतात. पेरूची पाने बद्धकोष्ठता, जुलाब या सर्व गोष्टींवर खूप फायदेशीर ठरतात.
पेरूच्या पानांचे सेवन कसे करावे ?
जर तुम्ही असे खात नसाल तर तुम्ही पेरूच्या पानांपासून चहा बनवून त्याचे सेवन करू शकता. पेरूच्या पानांपासून बनवलेल्या चहाचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करावे, त्यामुळे त्याचा शरीरावर अधिक परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया पेरूच्या पानांचा चहा कसा बनवला जातो.
1. सर्वप्रथम पेरूची 5-6 पाने घ्या.
2. चांगली धुवा.
3. आता एक भांडे घ्या त्यात पाणी घालून पाने व्यवस्थित धुवा.
4. आता पाने 10 मिनिटे चांगली उकळा.
5. आता ते गाळून चहाप्रमाणे सेवन करा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे
- Health Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम
- Belly fat : पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, ‘या’ दोन फळांपासून नेहमी दूर राहा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha