(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : सकाळी उठल्यानंतर डोक्याच्या उजव्या बाजूला दुखत असेल; तर 'हा' गंभीर आजार असण्याची शक्यता
Health Tips : जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी आणि जडपणाची समस्या अनुभवत असाल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमचे आरोग्य बिघडत चालले आहे.
Health Tips : जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर डोकेदुखी आणि जडपणाच्या समस्येचा सामना करत असाल, तर याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, तुमचे आरोग्य बिघडत चालले आहे. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. 8 तासांच्या झोपेनंतर तुम्हाला सकाळी खूप फ्रेश वाटते पण जर तुम्हाला पुरेशी झोप लागली नसेल तर तुम्हाला सकाळी डोकेदुखी होऊ शकते. 7-8 तासांच्या झोपेनंतरही जर तुम्हाला सकाळी डोकेदुखी, जडपणा आणि थकवा जाणवत असेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. दिवसभर एनर्जी कमी राहते आणि चिडचिडही वाढते. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो. यामागे अनेक कारणे असू शकतात. आज या ठिकाणी सकाळी उठल्यानंतर डोकेदुखी आणि जडपणाची कारणे नेमकी कोणती आहेत? हे जाणून घेणार आहोत.
डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीची समस्या
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी डोकेदुखी होण्याची अनेक कारणे असू शकतात. हे डिहायड्रेशनमुळे देखील होऊ शकते. कधीकधी रात्रीच्या वेळी मद्यपान केल्याने डोकेदुखी आणि जडपणा देखील होऊ शकतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यानेही डोकेदुखी होते. तणाव आणि झोपेमुळेही डोके जड राहते.
रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे
जर तुम्ही रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असाल तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. खरंतर, या लोकांना सर्कॅडियन रिदम डिसऑर्डरचा त्रास होऊ शकतो. शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नैसर्गिक बॉडी क्लॉकवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे त्यांना झोपायला आणि उठण्यात त्रास होऊ शकतो. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
झोपेचा विकार
पुरेशी झोप न मिळाल्यास डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण झोपेवर नियंत्रण ठेवणारा मेंदूचा भाग काही कारणाने बिघडला तर त्याचा तुमच्या झोपेवर खूप वाईट परिणाम होतो.
डोकेदुखीची कारणे
डोकेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. जसे की, डोक्याभोवती वेदना किंवा तीव्र वेदना होणे. सायनस आणि संसर्गामुळेही डोकेदुखी होऊ शकते. नाक, डोळ्यांवर देखील वेदना होऊ शकतात. काही लोकांना दुपारी 4 ते 9 च्या दरम्यान डोकेदुखी होऊ शकते.