(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : थंडीत हिरड्यांमधून सतत रक्तस्त्राव होतोय? प्रतिबंध करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स फॉलो करा
Health Tips : तुमचा ब्रश तुमच्या हिरड्या खराब करू शकतो. त्यामुळे ब्रश विकत घेताना योग्य निवडा.
Health Tips : अनेकांच्या हिरड्या घासताना रक्तस्राव होतो, ज्याकडे ते दुर्लक्ष करतात. कधीकधी ब्रश करताना हिरड्यांना दुखापत झाल्यामुळे किंवा ब्रिस्टल्स खूप कठीण झाल्यामुळे रक्तस्त्राव होऊ शकतो. पण, कधीकधी हिरड्यांमधून रक्त येणे हे काही गंभीर समस्येचे लक्षण आहे, जे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. तुम्हालाही अशी समस्या असेल तर वेळीच सावध व्हा. क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, हिरड्यांमधून रक्त येणे हे हिरड्यांना आलेले लक्षण असू शकते. तसेच, याला इतर अनेक कारणे असू शकतात, जसे की हार्मोनल असंतुलन, जीवनसत्वाची कमतरता आणि अगदी तणाव देखील याचे कारण असू शकते. हिरड्यांमधून होणारा रक्तस्त्राव तुम्ही कोणत्या मार्गांनी थांबवू शकता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
योग्य ब्रश निवडा
तुमचा ब्रश तुमच्या हिरड्या खराब करू शकतो. त्यामुळे ब्रश विकत घेताना लक्षात ठेवा की, त्याचे ब्रिस्टल्स मऊ आहेत. ब्रिस्टल्स कठोर असल्यामुळे, तुमच्या हिरड्या सोलून जाऊ शकतात, जे त्यांच्यासाठी खूप हानिकारक असू शकतात. त्यामुळे योग्य ब्रश निवडा.
तोंडी स्वच्छतेची काळजी घ्या
दातांमध्ये असलेल्या घाणीमुळे हिरड्यांवरही नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेमुळे तुम्हाला हिरड्यांमधून रक्तस्त्राव होण्याची समस्या देखील होऊ शकते. हे टाळण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश आणि फ्लॉस करा. यामुळे तुमच्या दातांमध्ये साचलेली घाण साफ होईल आणि तुमच्या हिरड्याही निरोगी राहतील.
मिठाच्या पाण्याचा वापर
कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करणे तुमच्या हिरड्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे कोमट पाण्याने गुळण्या केल्याने हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या टाळता येते.
व्हिटॅमिन सी खा
हिरड्यांमधून रक्तस्त्राव व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचा त्रास होऊ नये हे महत्त्वाचे आहे. त्याच्या कमतरतेमुळे स्कर्वी होऊ शकते, ज्यामध्ये हिरड्यांमधून रक्त येते. संत्री आणि किवी या फळांना तुमच्या आहाराचा भाग बनवा.
नियमित तपासणी
तुमच्या तोंडाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही नियमितपणे दंतवैद्याकडे जाणे आणि तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून काही समस्या असल्यास त्यावर वेळीच उपचार करता येतील.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.