Health Tips : वाढत्या वयाबरोबर गोष्टी विसरायला होतायत? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा; स्मरणशक्तीही वाढेल
Health Tips : वाढत्या वयानुसार व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यातील एक म्हणजे स्मरणशक्ती कमकुवत होणे.
Health Tips : जसजसं आपलं वय वाढत जातं त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर (Skin) देखील दिसू लागतो. त्याप्रमाणे वाढत्या वयाचा आपल्या मेंदूवरही हा परिणाम होतो. कालांतराने पूर्वीसारख्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. अशा वेळी कधी कधी आपल्याला स्वत:चाच राग येऊ लागतो. चिडचिड होते. कोणत्याच कामात मन रमत नाही. अशा वेळी आम्ही तुमच्यासाठी अशाच काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर केल्याने तुमच्या स्मरणशक्तीवर कोणताच परिणाम होणार नाही. तसेच, तुमच्या गोष्टीही लक्षात राहतील आणि मूडही चांगला राहील.
व्यायाम करा
सकाळी लवकर व्यायाम करणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. व्यायामासाठी तुमच्या वयाचा कोणताच फरक पडत नाही. याऊलट जसजसं वय वाढत जातं तसतसं मेडिटेशन, योगा करणं गरजेचं आहे. यामुळे तुमची शारीरिक तंदुरुस्ती तसेच तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल.
मन सक्रिय ठेवा
तुम्ही तुमच्या दिनचर्येत वाचन आणि लेखनाची सवय लावू शकता. वर्तमानपत्रांबरोबरच तुमच्या आवडीनुसार नवीन पुस्तके, लेख वाचत राहा. तसेच, तुम्ही हार्मोनियम, तबला, बासरी आणि पियानो यांसारखी वादने देखील वाजवू शकता. नवीन गोष्टी शिकू शकता.
खेळ खेळा
तुम्हाला जर तणाव जाणवत असेल तर तुम्ही एखादा खेळ देखील खेळू शकता. या सवयीमुळे तुमचं मन तीक्ष्ण राहण्यास मदत होऊ शकते. तुम्ही पजल, क्रॉस अॅन्ड क्विझ, चेस यांसारखे गेम खेळू शकता. हे तुमच्या मनाला योग्य ते विचार करण्यास मदत करतील.
गोष्टी लिहून लक्षात ठेवा
असं म्हणतात ज्या गोष्टी आपण लिहितो त्या जास्त लक्षात राहतात. अशा वेळी तुम्ही मोबाईल नंबर, घरचा पत्ता, नाव किंवा काही ठिकाणं डायरीत लिहून लक्षात ठेवा. तुम्ही डायरी लिहिण्याची सवय देखील लावू शकता. ही सवय तुमच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
तणाव मॅनेज करा
तणावाचा आपल्या एकूण आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, तुमचे वय कितीही असो, तणावापासून दूर राहण्यासाठी तुम्ही माइंडफुलनेसचा नियम फॉलो करा. यामध्ये तुम्ही ध्यान, दीर्घ श्वास, योग आणि निसर्गात मन रमवू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : तणावामुळे तुमची प्रोडक्टिव्हीटी कमी होऊ शकते; 'या' मार्गांनी स्ट्रेस मॅनेजमेंट करा