Health Tips : निरोगी आयुष्यासाठी 'या' सवयी लावून घ्या; हार्ट फेल्युअरच्या धोक्यापासून दूर राहाल
Health Tips : जर तुम्हाला हार्ट फेल्युअरच्या जोखमीपासून सुरक्षित राहायचे असेल, तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवणे
Health Tips : आजकाल कमी वयातच लोकांना हृदयविकाराशी (Heart) संबंधित अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय. भारतात गेल्या काही वर्षांत हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आपलं हृदय निरोगी असेल तर अनेक गोष्टी साध्य करता येतात त्यामुळे हदयाची काळजी घेणं गरजेचं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टी सोडून देणं तसेच काही सवयी लावून घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात टाळता येतो. हे उपाय नेमके कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
शारीरिकरित्या सक्रिय राहा
जर तुम्हाला हार्ट फेल्युअरच्या त्रासापासून मुक्त राहायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवा. तसेच, दिवसातून काही काळ चालणे, स्किपिंग करणे, जॉगिंग, सायकलिंग किंवा योगाद्वारे तुम्ही स्वत:ला अॅक्टिव्ह ठेवू शकता. जर तुम्ही कोणत्याही आजारामुळे अशा शारीरिक हालचाली करू शकत नसाल तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधून तुमच्या स्थितीनुसार योग्य व्यायाम निवडा.
निरोगी आहार घ्या
हृदय अपयश टाळण्यासाठी, आहाराकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे . तुमच्या आहारात फळे आणि भाज्या, कमी फॅटयुक्त दुग्धजन्य पदार्थ, काजू, कडधान्ये यांचे प्रमाण वाढवा. सॅच्युरेटेड फॅट, ट्रान्स फॅट, कोलेस्ट्रॉल, सोडियम, मांस आणि गोड पदार्थ आहारातून कमी करा. तसेच, मीठाचं प्रमाण देखील कमी करा.
वजन नियंत्रणात ठेवा
हृदयविकाराचा धोका जर टाळायचा असेल तर त्यासाठी तुमचं वज देखील नियंत्रित करणं गरजेचं आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि ब्लॉकेजसारख्या समस्या उद्भवू शकतात आणि याचा परिणाम हृदयावर होतो. आहारात आवश्यक बदल करून आणि शारीरिक व्यायाम करून तुम्ही वजन कमी करू शकता.
तणावापासून दूर राहा
तणावामुळे एकाच वेळी अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच, तणावामुळे तुमची झोप देखील कमी होते. यामुळे तुमच्या मूड, पचन संस्थेवर तसेच हृदयावर परिणाम होतो. त्यामुळे अनावश्यक तणाव घेऊ नका. तणाव कमी करण्यासाठी ध्यान, योगा करा.
धूम्रपान करू नका
धूम्रपानामुळे हार्ट फेल्युअरचा धोका आणखी वाढू शकतो. तंबाखूच्या धुरातून बाहेर निघणारे निकोटीन हृदयाची गती कमी करतात तसेच यामुळे रक्तदाब देखील वाढतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :