Health Tips : 'या' 7 लोकांच्या आहारात माशांचा समावेश नक्की असावा; हाडांच्या तंदुरुस्तीसह अनेक आजारही होतील दूर
Health Tips : माश्यांमध्ये अनेक प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक त्रास कमी होतात.
Health Tips : मासे हे एक मांसाहारी सीफूड आहे. माश्यांमध्ये (Fish) अनेक प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक त्रास कमी होतात. काही लोकांनी माशांचा आपल्या डाएटमध्ये नक्की समावेश करणं गरजेचं आहे. डॉक्टर आणि डाएटिशियनच्या म्हणण्यानुसार, मासे खाल्ल्याने अनेक आजारांपासून सुटका होते. माशांचे आपल्या शरीरासाठी आणखी कसे फायदे आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
ऑस्टियोपोरोसिसच्या रूग्णांनी माशांचं सेवन करावं
हे एक प्रकारचं हाडांचं दुखणं आहे. यामध्ये हाडांची मोठ्या प्रमाणात झीज होते. या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना मासे खाल्ल्याने खूप फायदा मिळतो. तसेच, हाडं मजबूत होण्यास मदत होते. जानेवारी 2015 मध्ये Pubmed वर एक संशोधन करण्यात आलं होतं. यामध्ये व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी मासे कसे फायदेशीर आहेत हे सांगण्यात आलं होतं.
स्मरणशक्ती कमजोर असलेल्या लोकांनी माशांचं सेवन करावं
जे लोक माशांचं सेवन करतात त्यांना वाढत्या वयानुसार स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी होत जातो. यामध्ये असे पोषक तत्त्व असतात जे अल्झायमर, डिमेंशिया, कमजोर स्मरणशक्तीसारख्या न्यूरोडिजनेरेटिव्ह आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात.
डिप्रेशनच्या रूग्णांनी माशांचं सेवन करावं
सध्याच्या काळात मानसिक आजारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामध्ये डिप्रेशनचा धोका सर्वाधिक आहे. यामुळे मूड ठिक नसणे, नैराश्य, ऊर्जेची कमतरता, एकांतपणा यांसारख्या आजारांचं प्रमाण वाढतं. माश्यांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं जे डिप्रेशनचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे.
हृदयविकाराच्या रूग्णांनी
जागतिक आरोग्य संघटनेनुसार हृदयाचा त्रास असल्यामुळे अनेक लोकांमध्ये मृ्त्यूचा धोका निर्माण होतो. वयाच्या आधीच होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी मासे फार उपयुक्त आहेत. माश्यांचा तुमच्या आहारात समावेश केल्याने हार्ट अटॅकचं प्रमाण फार कमी होतं.
स्ट्रोकचा धोका असणाऱ्या रूग्णांनी
हार्ट अटॅकनंतर स्ट्रोकचा धोका देखील फार मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. विशेष म्हणजे तरूणांमध्ये याचं प्रमाण वाढताना दिसतंय. माश्यांना ब्रेन हेल्दी फूड मानलं जातं जे स्ट्रोकचं प्रमाण कमी करण्यास उपयुक्त ठरतं.
दृष्टी कमी तसेच पोषक तत्त्वांची कमतरता असलेल्या रूग्णांनी
मासे खाल्ल्याने तुमची दृष्टी चांगली राहते. तसेच, ज्या लोकांमध्ये प्रोटीन, आयोडीन, व्हिटॅमिन डी आणि ओमेगा -3 ची कमतरता आहे त्यांनी माश्यांचं सेवन जास्तीत जास्त करावं.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :