एक्स्प्लोर

Health Tips : हाडे मजबूत आणि निरोगी करायची आहेत?; तुमच्या आहारात 'या' 5 पेयांचा समावेश करा

Health Tips : अनेक वेळा शरीरात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे कंबरदुखी, पाठदुखी इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागते.

Health Tips : आजकाल बदलती जीवनशैली (Lifestyle) आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे सांधेदुखीची समस्या सामान्य होत चालली आहे. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे अनेक वेळा कंबरदुखी, पाठदुखी यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. वृद्धत्वामुळे हाडांशी संबंधित समस्या देखील अनेक लोकांना उद्भवतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच काही ज्यूसबद्दल माहिती सांगणार आहोत. जे प्यायल्याने तुमची हाडे निरोगी राहण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊयात.

अननसाचा रस (Pineapple Juice)

अननसाचा रस प्यायल्याने तुमची हाडे निरोगी राहतात. चवीला गोड आणि आंबट असण्याबरोबरच अननसाचा रस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. अननसाच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे पुरेशा प्रमाणात आढळतात, जे अपचन आणि संधिवात यांसारख्या आजारांवर उपचार करण्यास मदत करतात.

संत्र्याचा रस (Orange Juice)

संत्र्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात, जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. संत्र्याच्या रसाची चवही गोड आणि आंबट असते, जी सर्वांनाच आवडते. शरीराला हायड्रेट ठेवण्या बरोबरच हाडांसाठीही संत्र्याचा रस फायदेशीर आहे. संत्र्याचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा म्हणून ओळखला जातो, जो तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतो.

स्ट्रॉबेरीचा रस (Strawberry Juice)

अँटी-ऑक्सिडंट्सने युक्त स्ट्रॉबेरीचा रस अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करण्यास मदत करतो. स्ट्रॉबेरीच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅंगनीज, कॉपर, झिंक असे अनेक पोषक घटक आढळतात. हा रस प्यायल्याने हाडांना ताकद मिळते.

ग्रीन ज्यूस (Green Juice)

हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के खूप महत्वाचे आहे. शरीरात या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या रसाचा समावेश करू शकता. यामुळे तुमची हाडे निरोगी ठेवण्यास मदत होईल.

दूध (Milk)

पोषक तत्वांनी युक्त दूध शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. हे कॅल्शियमचे समृद्ध स्त्रोत आहे, जे हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. रोज झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यायल्यास अनेक समस्या टाळता येतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा

महत्त्वाच्या बातम्या

Dry Eye in Monsoon: पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पावसाळ्यात डोळे कोरडे का पडतात? स्क्रीन टाइम डोळ्यांसाठी घातक, 'ड्राय आय'पासून बचावाचे उपाय
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
पितृत्वालाही वयोमर्यादा : वैज्ञानिक संशोधनातून सत्य जाणून घ्या
Jointpain in Monsoon: पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
पावसाळ्यात सांधेदुखीचा त्रास वाढला? चालतानाही पायातून कट-कट आवाज येतो? कारणे अन् उपाय जाणून घ्या
Oral Cancer: तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा
तोंडात दिसणाऱ्या 'या' खुणा अजिबात दुर्लक्षित करू नका; माऊथ कॅन्सरची सुरुवात असू शकते, तज्ज्ञांचा इशारा

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget