Health Tips : तांदूळ आणि कडधान्य साठवताना बुरशी लागते? 'ही' पद्धत वापरा; धान्य वर्षानुवर्ष टिकून राहील
Health Tips : दिर्घकाळ साठवलेल्या धान्यामध्ये कीटक आणि बुरशीची लागण होते.
Health Tips : थंडीच्या दिवसांत (Winter Season) किंवा पावसाळ्यात पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने स्टोअर करून ठेवलेल्या धान्यांमध्ये (Grain) अनेकदा किड लागते किंवा बुरशीची लागण होते. किडींचा प्रादुर्भाव झाल्यानंतर धान्यातील पोषक तत्वे हळूहळू नष्ट होऊ लागतात. अशा वेळी ही धान्य साठवून कशी ठेवायची असा प्रश्न पडतो. याचसाठी आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही धान्य अगदी सहज साठवून ठेवू शकता. आणि ते दिर्घकाळ टिकूनही राहतील.
गहू, तांदूळ आणि कडधान्ये 'या' पद्धतीने साठवा
हवाबंद डब्यात साठवा
थंडीच्या दिवसांत सूर्यप्रकाश मिळत नसल्याने साठवलेल्या धान्यात किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे धान्य साठवण्यासाठी हवाबंद डब्यांचा वापर करावा. यामुळे तुमचे धान्य दिर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते.
तमालपत्राचा 'असा' वापर करा
तमालपत्र मुळात सुगंधी असतात. त्याच्या सुगंधाने किड्यांची लागण होत नाही. तुम्ही ज्या डब्यात तृणधान्य साठवून ठेवणार आहात त्या डब्यात तमालपत्र ठेवा. यामुळे किटक डब्याच्या जवळपासही फिरणार नाहीत.
लसणाच्या पाकळ्या 'अशा' प्रकारे वापरा
तुम्हाला जर मूग-चना डाळ साठवून ठेवायची असेल तर त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकून ठेवा. लसणाच्या वासाने किटक धान्याच्या आसपासही फिरणार नाहीत. तसेच तुम्ही धान्य साठवणुकीच्या बॉक्समध्ये मॅचस्टिक्स देखील ठेवू शकता.
लवंगाचा देखील 'असा' वापर करा
जर तुम्ही हवाबंद डब्यात धान्य साठवत असाल तर त्यात लवंग आणि तमालपत्र ठेवा. यामुळे पांढरे आणि काळे दोन्ही कीटक दूर राहतील.
कडुलिंबाचा पाला
सर्वात आधी हवाबंद डबा घ्या आणि त्यात कडुलिंबाचा कोरडा पाला टाका. यामुळे दाणे जास्त काळ टिकून राहतील. पूर्वीच्या काळी लोक याच पद्धतीने धान्य साठवून ठेवत असतं.
सुकी लाल मिरची
कडधान्य जास्त दिवस साठवून ठेवायचे असतील तर त्यात कोरड्या लाल मिरच्या टाकून ठेवा. यामुळे तुमची डाळ कधीही खराब होणार नाही. थंडीच्या दिवसांत तुम्हाला जर तुमचं धान्य खराब होण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही या पद्धतींचा वापर करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :