Health Tips : चांगल्या रोगप्रतिकारशक्तीसाठी 'हे' पोषक घटक गरजेचे; आजच तुमच्या डाएटमध्ये समावेश करा
Health Tips : चांगली रोगप्रतिकारकशक्ती मिळविण्यासाठी चांगले पोषक घटक शरीरला मिळणे अत्यंत गरजेचे असतात.
Health Tips : नवीन वर्ष 2023 ला सुरूवात झाली आहे. या नवीन वर्षात अनेकांनी अनेक संकल्प केले असतील. यातलाच महत्त्वाचा संकल्प म्हणजे आरोग्याविषयीचा संकल्प. चांगली रोगप्रतिकारकशक्ती मिळविण्यासाठी चांगले पोषक घटक शरीरला मिळणे अत्यंत गरजेचे असतात. पोषक घटकांचा पुरवठा चांगल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.
आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवल्यास तुम्ही अधिक चांगल्या आरोग्याचे लाभ मिळवू शकता. ही गोष्ट वयोवृद्ध लोकांसाठी जितकी खरी आहे तितकीच ती श्वसनमार्ग, यकृताचे विकास, संधीवात, मधुमेह यांसारख्या प्रदीर्घ आरोग्य समस्यांचा सामना करणाऱ्या व्यक्तींनाही लागू होणारी आहे. अशा व्यक्तींनी तर स्नायूंची झीज आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे या दोन्ही गोष्टी टाळण्यासाठी अधिकच सतर्क राहणे गरजेचे असते.
अधिक चांगली रोगप्रतिकारशक्ती मिळविण्यासाठी अबॉटच्या न्यूट्रीशन बिझनेसच्या मेडिकल अँड सायन्टिफिक अफेअर्स विभागाचे अध्यक्ष डॉ. इरफान शेख (Dr. Irfan Shaikh, Head, Medical & Scientific Affairs at Abbott’s Nutrition business) यांनी महत्त्वाच्या पोषक घटकांची यादी दिली आहे. जे तुम्हाला सुदृढ बनवू शकतील.
1. एचएमबी (Beta-hydroxy-beta-methylbutyrate) : एचएमबी हा घटक स्नायूंची झीज कमी करून स्नायूंचं संतुलन राखण्यास मदत करतो. तुमचे शरीर ल्यूसाइन (leucine) नावाच्या अत्यावश्यक अमिनो आम्लाच्या विघटनप्रक्रियेद्वारे हा घटक नैसर्गिकरित्या निर्माण करते, मात्र हे आम्ल एचएमबीमध्ये परिवर्तित होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असते. अव्हॅकाडो, ग्रेपफ्रुट आणि कॉलिफ्लॉवरसारख्या पदार्थांमध्ये हा घटक लहान प्रमाणात उपलब्ध असतो.
2. प्रथिने : प्रथिने तुमच्या आरोग्याचं संतुलन राखण्यासाठी फार महत्त्वाचा आहे. हा तुमच्या शरीरातील स्नायू, हाडे, अंत:स्त्राव, प्रतिजैविके आणि एकूण प्रत्येक पेशीच्या जडणघडणीस मदत करणारा घटक आहे. अंडी हा प्रथिने मिळविण्याचा उत्तम स्त्रोत आहेच, पण त्याचबरोबर चने, पनीर, क्विनोआ, ग्रीक योगर्ट, शेंगदाणे आणि बदामही तुमच्या आहारातील प्रथिनांची मात्रा वाढविण्यास मदत करू शकतात. दुग्धजन्य पदार्थदेखील आरोग्यासाठी चांगले आहेत.
3. अ जीवनसत्त्व : ‘अँटी-इन्फेक्टिव्ह व्हिटॅमिन’ अर्थात संसर्गांना प्रतिबंध करणारे जीवनसत्व म्हणून ओळखला जाणारा हा घटक तुमची त्वचा, तोंड, पोट आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवतो. रताळी, भोपळा, गाजर आणि पालकमध्ये अ जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असते.
4. क जीवनसत्व : तुमची त्वचा आणि शरीरातील संयोगी उती (connective tissue) क जीवनसत्त्वाच्या उभारणीचे काम करते. त्याचबरोबर क जीवनसत्व पेशींचे हानीपासून संरक्षण करणाऱ्या अँटीऑक्सिडंटचेही काम करते. वनस्पतीजन्य पदार्थांमधून अधिकाधिक लोह शोषून घेण्यास मदत करून हे जीवनसत्व अॅनिमियापासूनही शरीराचे संरक्षण करते. संत्री हा क जीवनसत्वाचा सर्वोत्तम स्त्रोत आहे. त्याचबरोबर किवी, स्ट्रॉबेरीज, ब्रोकोली, टोमॅटो, कॉलिफ्लॉवर आणि रेड पेपर्स हे पदार्थही क जीवनसत्वाने समृद्ध आहेत.
5. ई जीवनसत्व : ई जीवनसत्व अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते आणि सेल मेम्ब्रेन्सचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करते. निरोगी पेशीपटल बाह्य सूक्ष्मजीवसंस्थांना बाहेर ठेवण्यास मदत करते आणि आजारांचा योग्य प्रतिकार करते. ई जीवनसत्व हे बहुतांश पदार्थांमध्ये सहज आढळते. खाद्यतेले, बिया आणि सुक्यामेव्याचे पदार्थ हे या जीवनसत्वाचे अत्यंत समृद्ध स्त्रोत आहेत.
6. ड जीवनसत्व : रोगप्रतिकारक पेशींना सक्रिय ठेवण्यास मदत करते. हा बहुगुणी पोषक घटक आपल्या शरीरात कॅल्शियम शोषले जाण्याच्या क्रियेस मदत करतो. निसर्गत:च ड जीवनसत्वाने समृद्ध असलेले फारसे पदार्थ नाहीत. काही चरबीयुक्त माशांचे मांस आणि फिश लिव्हर ऑइल, अंड्यातील पिवळा बलक, संत्र्याचा रस आणि चीज हे ड जीवनसत्व मिळविण्याचे काही स्त्रोत आहेत.
7. झिंक : झिंक हा धातू जखम भरून काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. योग्य वाढ आणि विकासासाठी, विशेषत: बालपण, किशोरवयात आणि गर्भावस्थेमध्ये ते अत्यंत महत्त्वाचे ठरते. शाकाहारी व्यक्तींसाठी चने, डाळी आणि शेंगा या सर्व गोष्टींतून झिंकचा व्यवस्थित पुरवठा होऊ शकतो. याशिवाय आपल्या आहारात बियांचा समावेश करणेही आरोग्यदायी ठरू शकेल.
8. द्रवपदार्थ आणि इलेक्ट्रोलाइट्स : द्रवपदार्थ (पाणी) आणि सोडियम, पोटॅशियम आणि क्लोराइड यांसारखे इलेक्ट्रोलाइट्स पुरेशा प्रमाणात घेतल्यास शरीराचे तापमान नियमित राखण्यास मदत होते. हे घटक आपल्या सांध्यांना वंगण पुरवतात, पेशी आणि उतींना निरोगी ठेवतात, शरीरातील टाकाऊ घटक बाहेर टाकतात आणि आपल्या शरीरातील आर्द्रता अधिक चांगल्या प्रमाणात टिकविण्यासाठी शरीराला द्रवपदार्थ टिकवून ठेवण्यासही मदत करतात. पालक, केळं यांसारख्या हिरव्या पालेभाज्या, केळी, प्रून्स आणि सुकविलेल्या अॅप्रिकॉट्ससारख्या अनेक पदार्थ आणि पेयांमध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात. याखेरीज शेंगा, डाळी, सुक्यामेव्याचे पदार्थ, सँड सीड्स यांतूनही बऱ्यापैकी इलेक्ट्रोलाइट्स मिळतात.
महत्त्वाच्या बातम्या :
Health News : काळजी घ्या, पंचविशीतील तरुणाईमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं