Health Tips : रात्री झोपताना पाय दुखतात? करा हे घरगुती उपाय
जर तुमचे पाय रात्री झोपताना दुखत असतील तर तुम्ही हे सोपे घरगुती उपाय ट्राय करू शकता.
Health Tips : दिवसातील कित्येक तास काम करणाऱ्या लोकांना पाय दुखीची समस्या जाणवते. अनेक कारणांमुळे पाय दुखी होते. अनेकदा रात्री झोपताना पाय दुखतात.यामुळे झोप देखील व्यवस्थित होत नाही. जर तुमचे पाय रात्री झोपताना दुखत असतील तर तुम्ही हे सोपे घरगुती उपाय ट्राय करू शकता.
अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगमध्ये एनाल्जेसिक तत्त्व असतात. एनाल्जेसिकमुळे पायांची सुज कमी होते. तसेच पाय दुखी देखील कमी होते. त्यामुळे जर तुमचे पाय दुखत असतील किंवा पायांना सुज आली असेल तर तुम्ही अॅपल सायडर व्हिनेगरचा ज्यूस पिऊ शकता.
अॅपल सायडर व्हिनेटरचा ज्यूस असा तयार करा-
1. एक कप कोमट पाणी घ्या
2. त्यामध्ये दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा
3.तसेच एक चमचा मध देखील त्यामध्ये टाका.
मेथीचे पाणी
मेथीच्या पाण्यामध्ये अँटिऑक्सीडेंट आणि अँटिफ्लेमेटरी ही तत्वे असतात. ज्यामुळे पाय दुखी कमी होते. यासाठी दोन ग्लास पाणी घ्या. त्यामध्ये दोन चमचा मेथीचे दाणे टाका. हे दाणे रात्रभर पाण्यात ठेवा. त्यानंतर सकाळी हे पाणी प्या. यामुळे पाय दुखील कमी होते.
योगा करा
योगा केल्यानं पायांमध्ये ब्लड सर्कुलेशन चांगलं होते. रक्त प्रवाह चांगला झाल्यानं पाय दुखीची समस्या जाणवत नाही तसेच योगामुळे शरीर डिटॉक्स देखील होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
- Amla benefits : सुपरफूड अशा आवळ्याचे 'हे' गुणधर्म आणि वापरण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे का?
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात सामील करा स्प्राउट्स, आरोग्यालाही होतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha