Symptoms Of Head Heat: उन्हाच्या झळा अन् डोक्याचा ताप! ही आठ लक्षणे दिसत असतील तर व्हा सावध
Symptoms Of Head Heat: सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तापमानाचा पाराही प्रचंड वाढलाय. यामुळे वाढलेल्या तापमानाचा परिणाम डोक्यावरदेखील होतो. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.
Symptoms Of Head Heat: उन्हाळ्याच्या काळात प्रकृतीशी संबंधित अनेक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. या वाढलेल्या तापमानाचा परिणाम मानवी शरीरावर होतो. त्यातून वेगवेगळ्या आजाराशी संबंधित लक्षणे दिसू लागतात. काही लोकांना पोटाचा त्रास जाणवतो. काहींना लिव्हर, आतड्यांशी संबंधित आजाराला तोंड द्यावे लागते. कडक उन्हाळा असला तरी बऱ्याच लोकांना कामानिमित्त घराबाहेर पडावं लागत. संपूर्ण दिवस उन्हात राहिल्यामुळे डोकदुखीची समस्या निर्माण होते. यामुळे डोकं गरम (Symptoms Of Head Heat) व्हायला लागतं आणि त्रास जाणवू लागतो. शरीराच्या आतून ताप आल्यासारखं जाणवू लागतं. अशावेळी लोक त्रासातून सुटका करून घेण्यासाठी पेनकिलर किंवा मेडिकल स्टोअरमधून आणलेल्या टॅब्लेट्स घेतात. मात्र, उन्हामुळे होणारी डोकंदुखी ही सामान्य बाब म्हणून अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र, या आजाराकडे दुर्लक्ष करू नये असे तज्ज्ञ म्हणतात.
डोकं गरम झाल्यामुळे जाणवणारी काही लक्षणं
1. ताप आल्यासारखं वाटणं
2. कपाळ गरम झाल्यासारखं वाटणं
3. डोक दुखणं आणि चक्कर येणं
4. घसा कोरडा पडणं
5. शरीर प्रचंड थकल्यासारखं वाटणं
6. डोक प्रचंड जड झाल्यासाखं वाटणं
7. घाम येणं
8. चक्कर, उलट्या येणं आणि अतिसाराची समस्या
स्वत: ची काळजी कशी घ्याल ?
उन्हाळ्याच्या काळात तापमान खूप वाढल्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ लागतो. तसेच डोक गरम आणि जड पडतं. याच कारण बॉडी पूर्ण डिहायड्रट झालेली असते. थकवा जाणवू लागतो. यामुळे उष्णता पाहता, सोबत नेहमी पाण्याची बॉटल कॅरी करायला हवी. या दिवसात भरपूर पाणी प्या, फळांचं ज्यूस प्या आणि काकडी, टरबूज, कलिंगड यासारखे फळही खायला विसरू नका. यामुळे शरीरातील तापमानाचं संतुलन राखण्यास मदत मिळते. शक्यतोवर उन्हात थांबू नका. गरज असेल तरच घरातून बाहेर पडा. ऊन्हाळ्यात बाहेर पडताना संपूर्ण अंगात खादी कपडे घाला. त्यामुळे घामाचा आणि गरमीचा त्रास होणार नाही. डोक्यावर टोपी घालायची सवय लावून घ्या. सगळ्यात महत्वाचं पाण्याची बॉटल कॅरी करायला विसरू नका. यासोबत मसालेदार आणि तिखट पदार्थ टाळा. सोडा आणि कोल्डड्रिंक्स पिणं टाळा. डोकं शांत करण्यासाठी मिंट किंवा लिंबाचा लेप लावा. यामुळे शरीरातील उष्णता कमी होईल. डोकं शांत करण्यासाठी डोक्यावरून पाणी टाका आणि एका थंड ठिकाणी बसून आराम करा.
(Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ वाचकांच्या जागरूकतेसाठी प्रकाशित केलेली आहे. यापैकी कोणताही मजकूर हा वैद्यकीय सल्ला नाही. आपल्या शंका किंवा आरोग्यविषयक समस्येसाठी तुमच्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )