एक्स्प्लोर

Health Tips : पाठदुखी असेल तर हलक्यात घेऊ नका, हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असण्याची शक्यता; कसे ते जाणून घ्या

Health Tips : पाठीच्या खालच्या भागात अचानक दुखणे कधीकधी हृदयविकाराचा झटका सूचित करते.

Health Tips : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सगळीकडे ह्रदयविकाराच्या झटक्याचं (Heart Attack) प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे 30 ते 40 वयोगटातील व्यक्तींमध्येही हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. काही प्रकरणांमध्ये, लोकांना अचानक पाठदुखीचा त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला अचानक पाठदुखीचा त्रास सुरू झाला तर ते हलक्यात घेऊ नका. विशेषत: दुखण्याबरोबरच, श्वास घेण्यास त्रास, छातीत दाब किंवा वेदना जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. हे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक किंवा इतर गंभीर परिस्थितींचे लक्षण असू शकते. वेळीच उपचार सुरू करून जीव वाचवता येऊ शकतो. या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 

पाठीत दुखणे हलक्यात घेऊ नका 

हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर स्थिती आहे. ज्यामध्ये हृदयाच्या धमन्यांमधील रक्त प्रवाह अचानक थांबतो. हे रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यामुळे किंवा रक्ताच्या गुठळ्यांमुळे होऊ शकते. जेव्हा पुरेसे रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा शरीराच्या इतर भागांमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. यामुळे, हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, पाठ, हात, पोट किंवा मान अशा शरीराच्या कोणत्याही भागात अचानक तीव्र वेदना सुरू होतात. अशा वेदना सहसा खूप तीव्र असतात आणि हलके घेऊ नये. असे काही घडल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. 

हृदयविकाराची इतर लक्षणे 

छातीत दुखणे किंवा दाब येणे : जडपणाच्या तक्रारी, छातीत जळजळ किंवा वेदना ही हृदयविकाराची सर्वात सामान्य लक्षणे आहेत.

श्वास घेण्यात अडचण येणे : श्वास घेण्यात अडचण किंवा धाप लागणे.

घाम येणे : अचानक घाम येणे किंवा थंडी वाजणे.

चक्कर येणे : कोणत्याही कारणाशिवाय अचानक चक्कर येणे आणि डोके हलके वाटणे.

भूक न लागणे : अनैसर्गिक भूक न लागणे.

उलट्या आणि मळमळ होणे : कोणत्याही कारणाशिवाय उलट्या आणि मळमळ होऊ शकते. 

पाठदुखी : पाठीच्या खालच्या भागात अचानक दुखणे कधीकधी हृदयविकाराचा झटका सूचित करते. 

यापैकी कोणतेही लक्षण हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते, म्हणून सावधगिरी बाळगा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
Embed widget