(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हिवाळ्यात शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता कशी पूर्ण कराल? 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर
Health Tips : व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे.
Health Tips : शरीर योग्यरित्या कार्य करण्यासाठी, अनेक खनिजांसह पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आणि प्रथिने आवश्यक आहेत. यातील काही पोषक तत्वे आहारातून शरीराला मिळतात आणि काही वातावरणातून किंवा निसर्गाच्या सान्निध्यात राहून मिळतात. यापैकी एक म्हणजे व्हिटॅमिन डी, जो अत्यंत आवश्यक घटक आहे आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतो. व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. मात्र, हिवाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे शरीराला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. अशा परिस्थितीत सूर्यप्रकाशाशिवाय व्हिटॅमिन डीची कमतरता कशी भरून काढता येईल हे जाणून घेणं गरजेचं आहे.
व्हिटॅमिन डी किती महत्वाचे आहे?
व्हिटॅमिन डी हा शरीरासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. व्हिटॅमिन डी 3 चे जास्तीत जास्त उत्पादन सूर्याच्या किरणांपासून होते. अनेक अभ्यासात असे आढळून आले आहे की, 8 ते 10 मिनिटे शरीरातील 25% भाग सूर्यप्रकाशात राहिल्यास व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होऊ शकते. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश सहज उपलब्ध होतो, पण हिवाळ्यात अनेक दिवस सूर्यप्रकाश नसताना ही समस्या वाढते. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन डीची कमतरता काही आहाराद्वारे भरून काढता येते.
'या' आहारामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकते
मासे-अंडी
काही प्रकारच्या माशांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असते. हे खाल्ल्याने ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज पूर्ण होऊ शकते. माशांच्या व्यतिरिक्त अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये व्हिटॅमिन डी आढळते. अंड्यातील पिवळे बलक हे प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांसारख्या अनेक महत्त्वाच्या पोषक घटकांसह व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात ते खाल्ल्याने व्हिटॅमिन डीचा पुरवठा होऊ शकतो.
मशरूम
व्हिटॅमिन डीचा पुरवठा करण्यासाठी शाकाहारी लोक मशरूमचे सेवन करू शकतात. मशरूममधून शरीराला पुरेशा प्रमाणात सेलेनियम, व्हिटॅमिन सी आणि फोलेट मिळू शकते. 7IU व्हिटॅमिन डी फक्त 100 ग्रॅम मशरूममध्ये आढळते. याचे नियमित सेवन केल्याने अनेक फायदे होतात.
फळभाज्या
संत्री आणि केळीमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय पालक, कोबी, सोयाबीनआणि काही प्रकारचे ड्रायफ्रुट्स यांद्वारेही या जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर मात करता येते. त्यांचे नियमित सेवन केल्याने हिवाळ्यात शरीराला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : 'या' पदार्थांतून शरीराला मिळतात हेल्दी फॅट; वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त