(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : पार्टीनंतर तुमचे डोकं दुखत असेल तर, 'या' पद्धतींमुळे तुम्हाला तात्काळ आराम मिळेल
Health Tips : अनेक वेळा पार्टीनंतर लोकांना डोकेदुखीचा त्रास सुरू होतो. जर तुम्हाला तात्काळ आराम मिळवायचा असेल तर हे घरगुती उपाय तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळवून देऊ शकतात.
Health Tips : ऑफिस आणि घरच्या कामाच्या व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) अनेकदा आपण स्वत:साठी वेळ काढतो आणि पार्टी करतो. पण ही पार्टी करताना चुकीच्या सवयींमुळे अनेकदा आपल्याला डोकेदुखीचा सामना करावा लागतो. अनेक वेळा रात्रभर आराम करूनही या समस्येपासून आराम मिळत नाही. अशा वेळी, असे अनेक उपाय आहेत जे व्यक्तीला या डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात हे उपाय नेमके कोणते आहेत.
लिंबूपाणी (Lemon Water)
यासाठी तुम्हाला कोमट पाणी घ्यावे लागेल आणि नंतर त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. हे पाणी प्यायल्याने मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तुम्ही ते पार्टीनंतर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील पिऊ शकता. लिंबू पाणी (Lemon Water) हे अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. अनेक गुणांवर रामबाण उपाय आहे.
आलं (Ginger)
अनेक आजारांपासून आराम मिळवून देण्यासाठी आलं (Ginger) खूप प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे, यामुळे डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळतो. यासाठी तुम्ही चहामध्ये आले टाकून प्या. पण एकाच वेळी जास्त आले खाऊ नका हे लक्षात ठेवा. ज्यांना आल्याची अॅलर्जी असेल त्यांनी डोकेदुखीसाठी आल्याचा वापर करू नये.
सफरचंद (Apple)
सफरचंद (Apple) आणि सफरचंद सायडर व्हिनेगर देखील डोकेदुखीपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात. पार्टी केल्यानंतर तुम्हाला जर डोकेदुखी होत असेल तर तुम्ही सफरचंद व्हिनेगरचा डेकोक्शन पिऊ शकता. नाहीतर सफरचंद कापून त्यावर मीठ शिंपडा आणि खा.
तुळशीची पाने (Tulsi Leaves)
तुळशीची (Tulsi Leaves) पाने औषधी वनस्पती म्हणून वापरली जातात. डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी एक कप पाणी उकळून त्यात तुळशीची काही पाने टाका आणि थोडा वेळ उकळू द्या. यानंतर, हळू हळू हे पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मध टाकून चहामध्ये तुळस घालून पिऊ शकता.
त्यामुळे तुम्हाला जर डोकेदुखीपासून आराम मिळवायचा असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करून डोकेदुखीच्या समस्येपासून आरा मिळवू शकता.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.