Health Tips : वाढत्या वयानुसार तुमची हाडे निरोगी ठेवायची असतील तर, 'या' टिप्स तुमच्यासाठीच...
Health Tips : वाढत्या वयानुसार हाडांची घनता कमी होऊ लागते. त्यामुळे हाडे निरोगी ठेवण्यासाठी आपण विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
Health Tips : वय वाढले की गुडघेदुखी, पाठदुखी अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याचं सर्वात मोठे कारण म्हणजे कालांतराने हाडे कमकुवत होतात. वाढत्या वयानुसार, हाडं झिजतात, ज्यामुळे ते कमकुवत होतात. म्हणून आपण आपली हाडे मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करणे फार महत्वाचे आहे. वयानुसार हाडे कमकुवत होणे ही नैसर्गिक बाब असली तरी काही मार्गांनी आपण ही समस्या नक्कीच कमी करू शकतो. आपण कोणत्या मार्गांनी आपली हाडे निरोगी आणि मजबूत ठेवू शकता ते जाणून घेऊयात.
कॅल्शियम
कॅल्शियम हाडांच्या मजबुतीसाठी खूप महत्वाचे आहे. हे हाडे तयार आणि मजबूत करण्याचे काम करते. त्याच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. त्याच्या कमतरतेमुळे, नवीन हाडे तयार होत नाहीत आणि हाडे फ्रॅक्चर होण्याचा धोका देखील लक्षणीय वाढतो. त्यामुळे कॅल्शियमयुक्त पदार्थ जसे की सोया उत्पादने, दूध, चीज, बदाम, तीळ इत्यादींचा आहाराचा भाग बनवा.
व्हिटॅमिन-D
व्हिटॅमिन-D आपल्या शरीराला कॅल्शियम शोषण्यास मदत करते. याच्या कमतरतेमुळे शरीर कॅल्शियम वापरू शकत नाही आणि हाडे कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे आपल्या आहारात व्हिटॅमिन डी समृद्ध अन्नपदार्थ जसे की, मशरूम, अंडी, फॅटी फिश, दूध इत्यादींचा समावेश करा. याशिवाय सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा उत्तम स्रोत आहे. मात्र, जास्त वेळ उन्हात राहू नका.
नियमित व्यायाम करा
विशिष्ट प्रकारचे व्यायाम केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडांची घनता कमी होण्यापासून रोखण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे फायदेशीर ठरते आणि नवीन हाडे तयार होण्यासही मदत होते. त्यामुळे वेट ट्रेनर हा तुमच्या व्यायामाचा भाग बनवा. तसेच, लक्षात ठेवा की इतके वजन उचला की त्यामुळे तुमच्या हृदयावर जास्त दबाव पडणार नाही आणि ते नेहमी ट्रेनरच्या देखरेखीखाली करा.
वजन नियंत्रित ठेवा
तुमच्या शरीराच्या वजनाचा तुमच्या हाडांवरही परिणाम होतो. जास्त वजनामुळे हाडांवर जास्त ताण येतो, ज्यामुळे ते कमकुवत होऊ शकतात. त्याचप्रमाणे वजन कमी झाल्यामुळे हाडांची घनता कमी होऊन ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. त्यामुळे निरोगी वजन असणे महत्त्वाचे आहे. यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :