Health Tips : जर तुम्हाला हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? 'ही' आहेत कारणं आणि उपचार
Health Tips : तुम्हालाही या ऋतूत श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याचे कारण असू शकते.

Health Tips : हिवाळ्याचा (Winter Season) ऋतू म्हणजेचं थंडीबरोबर अनेक रोगांना आमंत्रण देणारा महिना. यामध्ये सर्दी, ब्रेन स्ट्रोकपासून हृदयविकारापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. अशा वेळी, स्वत:साठी कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा घातक ठरू शकतो. या ऋतूमध्ये अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. तुम्हालाही या ऋतूत श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याचे कारण असू शकते थंड वारे. ज्यामुळे आपल्याला श्वास घेण्यास त्रास होतो. श्वासनलिकेतील द्रवपदार्थाचा एक थर खूप लवकर नष्ट होऊ लागतो, ज्यामुळे आपला घसा कोरडा होऊ लागतो. यासोबतच हिवाळ्यात श्लेष्माचे उत्पादनही झपाट्याने होते, ज्यामुळे घशाला संरक्षण मिळते. या ऋतूत श्वास घेण्यास त्रास होण्याची कारणे आणि त्यावरचे उपचार नेमके कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
श्वास घेण्यास त्रास होण्याचे कारण
- वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे श्वसनमार्ग आकुंचन पावतात, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.
- कफ किंवा श्लेष्माचे जास्त उत्पादन आणि नंतर हळूहळू घट्ट होणे आणि फुफ्फुसात जमा होणे.
श्वास घेण्यास त्रास होत असेल तर 'असे' उपचार करा
आपल्या कपड्यांची काळजी घ्या
हिवाळ्याच्या ऋतूत तुमच्या कपड्यांकडे विशेष लक्ष द्या. कारण थंड वाऱ्यांमुळे शरीराचे तापमान कमी होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही हिवाळ्यात बाहेर जात असाल तर पूर्ण बाह्यांचे लोकरीचे कपडे घाला. तसेच मोजे आणि हातमोजे घाला. शरीराचे तापमान सामान्य ठेवा.
पर्यावरणीय ट्रिगर्स तसेच इतर ट्रिगर टाळा
वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर नक्कीच होतो. इतरही काही घटक आहेत जे आपल्याला आपल्या जीवनशैलीत चालना देतात. जसे की, आपण धूम्रपान टाळले पाहिजे, धुळीची ऍलर्जी टाळली पाहिजे, एरोसोल असलेली उत्पादने टाळली पाहिजेत. याशिवाय धूळ, साचा, बुरशी, कीटकनाशके इत्यादींपासूनही अंतर ठेवा.
निरोगी जीवनशैली स्वीकारा
निरोगी जीवन जगण्यासाठी, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे हे स्वतःसाठी तसेच तुमच्या कुटुंबासाठी फायदेशीर आहे.
- दररोज घरी शिजवलेले हेल्दी अन्न खा.
- रोज योगा, व्यायाम करा.
- श्वसनाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे संसर्ग टाळा.
- कोणताही ताण अजिबात घेऊ नका.
- आवश्यक असल्यास, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- जर श्वासोच्छवासाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या वाढू लागली, तर तुम्ही पल्मोनोलॉजिस्ट किंवा तज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.























