Health Tips : पावसाळ्यात आजारी पडायचे नसेल तर स्वतःला लावा या सवयी
पावसाळा सुरू झाला की उन्हाळ्याच्या उकाड्यापासून आराम मिळतो. मात्र हाच पावसाळा अनेक आजारांना आमंत्रण देतो.
Monsoon Health Tips : पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात जीवनशैलीत आणि खाण्यापिण्यात अनेक बदल करावे लागतात. या ऋतूमध्ये खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण यामुळे अनेक आजार शरीरात पोहोचतात. जर तुम्हाला पावसाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवायचे असेल ,तर अशा हवामानात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेतले पाहिजे. काही सवयी आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकतात.
उघड्यावरील पदार्थ खाणे टाळा
रस्त्याच्या कडेला असलेल्या चाट गाड्यांवरील चाट खायला तुम्हाला आवडत असेल तर पावसाळ्यात तुम्ही दक्षता बाळगली पाहिजे. पावसाळ्यात रस्त्यावरील पद्धार्थ खाल्ल्याने आरोग्याला गंभीर हानी पोहोचू शकते. उघड्यावर मिळणाऱ्या पद्धार्थ किंवा इतर गोष्टी शरीराला हानी पोहोचवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, उघड्यावर मिळणारे खाद्यपदार्थ पाहताना जरी ते चविष्ट वाटत असले, तरी त्यात अनेक विषाणू असू शकतात, जे आरोग्याला हानी पोहोचवण्यासाठी पुरेसे असतात. पावसात स्ट्रीट फूड आणि जंक फूड पूर्णपणे टाळावे.
थंड पाण्याने आंघोळ टाळा
पावसाळ्यात उष्णता, आर्द्रता आणि चिकटपणा सामान्य आहे. ते टाळण्यासाठी लोकांना थंड पाण्याने आंघोळ करायला आवडते. मात्र, पावसाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणंही धोकादायक ठरू शकतं. ताजेपणाकरता थंड पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाण्याने आंघोळ करणे चांगले मानले जाते. लेदर शूज पावसाळ्यात घालू नका. पाण्यात भिजल्याने शूज तर खराब होतातच पण त्वचेलाही नुकसान होते. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात हवेशीर शूजच घालावेत. चामड्याच्या शूजमधून हवा जात नाही आणि एकदा पाणी आत गेल्यावर ते बाहेरही येत नाही. त्यामुळे शूजमधील आर्द्रता वाढते. आर्द्रतेमुळेही बुरशीचा संसर्ग होऊ शकतो.
कमी शिजलेली अंडी खाऊ नका
अंडी हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मात्र पावसाळ्यात अंडी खाणेही धोकादायक ठरू शकते. पावसाळ्यात कमी शिजलेले अंडे खाणे टाळावे. आरोग्य तज्ञांच्या मते, असे काही जंतू कच्च्या किंवा कमी शिजलेल्या अंड्यांमध्ये आढळतात, जे तुम्हाला आजारी पाडू शकतात. त्यामुळे अपचन, पोटदुखी, अन्नातून विषबाधा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच अंडी चांगली शिजवल्यानंतर खावीत.
'या' गोष्टी खा
जर तुम्ही पावसाळ्यात आले, लसूण आणि हळद यांचे सेवन करत नसाल तर ते करायला सुरुवात करा. कारण हे असे घटक आहेत जे आरोग्य चांगले ठेवतात. यामध्ये दाहक-विरोधी घटक आढळतात, जे बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीमुळे होणारे आजार मुळापासून दूर करतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Fashion Tips : लेटेस्ट ट्रेंडचे 'हे' कम्फर्टेबल स्निकर्स देतील तुम्हाला क्लासी लुक
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )