Fashion Tips : लेटेस्ट ट्रेंडचे 'हे' कम्फर्टेबल स्निकर्स देतील तुम्हाला क्लासी लुक
स्निकर्स सध्या चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत. तरुण पिढीमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. सेलिब्रिटी असोत किंवा कोणत्याही क्षेत्रातील लोकप्रिय आयकॉन, तुम्ही त्यांना अनेकदा स्निकर्स घातलेले पाहिले असेल.

Sneakers : स्निकर्स सध्या चांगलेच ट्रेंडमध्ये आहेत. तरुण पिढीमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. सेलिब्रिटी असोत किंवा कोणत्याही क्षेत्रातील लोकप्रिय आयकॉन, तुम्ही त्यांना अनेकदा स्निकर्स घातलेले पाहिले असेल. स्निकर्स व्यक्तिमत्वाला वेगळा ग्रेसफुल लुक देतात. उत्कृष्ट लुकसोबतच हे स्निकर्स घालण्यास अतिशय आरामदायक आहेत. हे पायांवर व्यवस्थित बसतात आणि पूर्ण आराम देतात. हे सर्व स्निकर्स उच्च दर्जाच्या मटेरियल पासून बनलेले असतात. कमी किमतीत हे खूप चांगले आहेत. त्याचे बाह्य मटेरियल सिंथेटिक आहे आणि सोल मटेरियल रबरचे असतात. हे पायांवर खूप आरामदायकरित्या बसते. हे कोणत्याही प्रकारच्या पृष्भागावर मजबूत ग्रिपसोबत चांगले बाउंस देखील प्रदान करते. हे हवेशीर आहे आणि त्यामुळे तुम्ही यास दिवसभर घातले तरीही तुम्हाला आरामदायी वाटत राहते. प्रीमियम दर्जाचे स्निकर्स (Sneakers) आहेत. हे वापरण्यास अतिशय आरामदायक आहेत आणि याचा आकर्षक लुक तुमची स्टाईल देखील मेन्टेन ठेवतो. स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी, मॉर्निंग वॉक, रनिंग, जिम यासोबतच तुम्ही ते कॅज्युअल शूज म्हणूनही घालू शकता. हे स्निकर्स अतिशय आकर्षक रंगात बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी हे काही चांगल्या दर्जाचे स्निकर्स बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Air Jordan 4
Air Jordan 4 स्नीकर्स हे स्नीकर्सच्या सर्वोत्कृष्ट प्रकारांपैकी आहेत. बास्केटबॉल कोर्टवरही ते फायद्याचे ठरतात. तसेच ते पार्टीरसाठीही योग्य ऍक्सेसरीसाठी ठरतात. विशेषत: जेव्हा तुम्ही त्यांना चिनो, ट्राउझर्स किंवा जीन्सच्या योग्य जोडीसह मॅच करू शकता.
Nike Terminator Sneakers
हे स्निकर्सच्या सर्वात ओळखीच्या प्रकारांपैकी आहेत. तुम्ही काहीतरी वेगळं करावं आणि नेहमीच्या स्निकर्सपेक्षा काहीतरी वेगळे ट्राय करायचे असल्यास हा पर्याय तुमच्याकरता फायदेशीर आहे. हे स्निकर्स फॅशनेबल तर आहेतच, शिवाय, ते अत्यंत आरामदायी, टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे देखील आहेत.
Adidas Samba Sneakers
Adidas चे हे शूज सर्व प्रकारच्या पोशाखांसोबत दिसायला चांगले दिसतात. हे फॅन्सी स्निकर्स तुम्ही फाॅर्मल पोशाखाखाली देखील घालू शकता.
Nike Air Zoom Vomero 5
आरामदायक, साधे आणि तरीही सुपर ट्रेंडी असे हे स्नीकर्स आहेत. ते सहजपणे सर्व प्रकारच्या पोशाखांसोबत मॅच केले जाऊ शकतात. मग ते कॅज्युअल, स्मार्ट कॅज्युअल किंवा अगदी पार्टीचे कपडे असोत. अशा प्रकारे, डेनिम शॉर्ट्स, लिनेन चिनोज आणि फॉर्मल ट्राउझर्स बरोबर तितकेच चांगले दिसतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Use Of Social Media : लोक सोशल मीडियावर किती वेळ घालवतात? घ्या जाणून
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
