(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करायचीय?; तर 'या' खाद्यपदार्थांना तुमच्या आहाराचा भाग बनवा
Health Tips : जर तुम्हाला मधुमेहाचा सहज बळी व्हायचे नसेल, तर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे.
Health Tips : मधुमेह (Diabetes) हा एक धोकादायक आजार आहे. मधुमेहग्रस्त लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आपल्या शरीरात इन्सुलिनची कमतरता किंवा इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढल्यामुळे मधुमेह होतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते, ज्यामुळे नंतर अवयव निकामी होऊ शकतात. जर तुम्हाला मधुमेहाचा सहज बळी व्हायचे नसेल, तर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या जीवनशैलीबरोबरच काही खाद्यपदार्थही यामध्ये तुम्हाला मदत करू शकतात. चला जाणून घेऊयात कोणत्या खाद्यपदार्थांना आपल्या आहाराचा भाग बनवून ते कमी किंवा नियंत्रित केले जाऊ शकतात.
अक्खे दाणे
संपूर्ण धान्य, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वात प्रभावी अन्नपदार्थांपैकी एक आहे. त्यामध्ये हेल्दी कार्बोहायड्रेट्स आणि फायबर आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी राहते. त्यामुळे ओट्स, ज्वारी, बाजरी यांसारख्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा. हे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढवत नाहीत. जे मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यास मदत करतात.
ब्रोकोली
ब्रोकोली इंसुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करू शकते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. अनेक पदार्थ बनवून तुम्ही याला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. यामध्ये आढळणारे फायबर मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
मसूर
मसूरमध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळतात. ज्यामुळे ते रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. मसूर डाळ, सोयाबीन इ. हे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला इतर पोषक तत्वे देखील मिळतात, ज्यामुळे आरोग्य सुधारते.
बेरीज
बेरी दिसायला लहान जरी असल्या तरी आरोग्यासाठी अनेक फायदे देऊ शकतात. यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय ते इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यासही मदत करतात.
लसूण
तुमच्या जेवणाची चव वाढवण्याबरोबरच इतर अनेक गोष्टींमध्ये लसूण फायदेशीर आहे. शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढण्याबरोबरच इन्सुलिनची संवेदनशीलताही वाढते. त्यामुळे लसूण रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )