(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी 'या' सवयी लावा; अनेक आजारांपासून दूर राहाल
Health Tips : मजबूत प्रतिकारशक्तीसाठी निरोगी जीवनशैलीचे पालन करणे फार महत्वाचे आहे.
Health Tips : सध्याच्या काळात बिघडलेल्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपण अनेक आजारांना बळी पडत चालले आहोत. अशा वेळी प्रत्येकालाच निरोगी लाईफस्टाईलची गरज आहे. पण निरोगी लाईफस्टाईलसाठी तुमची रोगप्रतिकारकशक्ती देखील मजबूत असणं गरजेचं आहे. जेव्हा तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल, तेव्हाच तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक आजारांपासून दूर राहू शकता. मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी तुम्ही काही चांगल्या सवयी लागू करू शकता. या सवयी लावून तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल. मजबूत रोगप्रतिकारक शक्तीसाठी कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
हायड्रेटेड रहा
निरोगी राहण्यासाठी, भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होईल. पाणी तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते.
चांगली झोप गरजेची
चांगल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी दररोज चांगली झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. त्यामुळे रोज 7 ते 8 तासांची झोप घ्या. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं. तुमचा थकवा निघून जातो. तसेच तुम्ही कोणतेही काम पूर्ण ऊर्जेने करू शकता.
शारीरिक हालचाल करा
नियमित व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. तुमच्या शरीराच्या ताकदीसाठी हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे रोज काही वेळ व्यायाम करा.
तणावमुक्त रहा
तुमच्या चांगल्या प्रतिकारकशक्तीसाठी तुम्ही रोज ध्यानदेखील करू शकता. यामुळे तुम्ही तणावमुक्त राहता. ताण घेतल्याने तुमच्या प्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पुस्तके वाचा. स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त ठेवा.
तुमच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करा ज्यात हेल्दी फॅट्स भरपूर असतील. तुम्ही तुमच्या आहारात फ्लॅक्स सीड्स, ऑलिव्ह ऑईल आणि चिया सीड्स इत्यादींचा समावेश करू शकता. या बिया आरोग्यासाठी खूप चांगल्या आहेत.
निरोगी आहार घ्या
तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर आहेत. तुम्ही संपूर्ण धान्य, हिरव्या भाज्या आणि फळे इत्यादी खाऊ शकता. या गोष्टी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यास मदत होते.
लिंबूवर्गीय फळे
लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते. या गोष्टी खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. लिंबूवर्गीय फळांमध्ये लिंबू, किवी आणि संत्रा या फळांचा समावेश होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :