(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : हिवाळ्यात सारखी सर्दी होते? करा 'हे' घरगुती उपाय
थंडीमध्ये काही लोकांना सतत सर्दी किंवा कफचा त्रास (Cold and Cough Problem in winter) होतो.
Health Tips Cold and Cough Remedies : हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. (Winter Season) थंडीमध्ये काही लोकांना सतत सर्दी किंवा कफचा त्रास (Cold and Cough Problem in winter) होतो. तुम्हाला जर थंडीमध्ये सतत सर्दी आणि कफ होत असेल तर हे घरगुरी उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता.
वाफ घ्या (Steam)
हिवाळ्यात सर्दी किंवा कफ झाला तर सर्वप्रथम वाफ घ्या. वाफ घेतल्याने गरम हवा नाकात आणि तोंडात जाते. त्यामुळे सर्दी किंवा कफ कमी होतो. वाफ घेण्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये निलगिरी तेलाचे दोन थेंब टाका. दिवसातून दोन वेळा या पाण्याची घेतल्यानंतर तुमची सर्दी कमी होईल.
नोझल स्ट्रिप्स (Nazal Stripe) चा वापर करा
हिवाळ्यात सर्दी झाल्याने निट श्वास घेता येत नाही. त्यामुळे रात्री झोप न लागणे, डोके दुखणे इत्यादी त्रास होऊ शकतात. अशा वेळी नोझल स्ट्रिप्सचा वापर करा. नोझल स्ट्रिप्समुळे नाकातील नसा ओपन होतात. नोझल स्ट्रिप्स वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
जर हिवाळ्यात सतत कफ होत असेल तर दिवसातून दोन वेळा गरम पाण्याने गुळण्या करा. या पाण्यामध्ये मिठ टाका. यामुळे कफ कमी होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weight Loss: नाश्ता करताना 'या' चुका टाळा, अन्यथा लठ्ठपणाचे व्हाल शिकार