Health Tips : 'हे' 6 ड्राय फ्रूट्स शरीराला आतून उबदार ठेवतात; थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठीही गुणकारी
Health Tips : ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी हेल्दी स्नॅक्स म्हणून खाण्याव्यतिरिक्त ते हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहेत.
Health Tips : ड्रायफ्रूट्स (Dry Fruits) खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यापासून आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. पण हिवाळ्याच्या ऋतूत इतर आरोग्य फायद्यांबरोबरच ते तुमचे शरीर उबदार ठेवण्यासही मदत करते. कोणते ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीराला फायदे मिळू शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
काजू खाल्ल्याने फायबरचे प्रमाण जास्त आणि साखर कमी असते. त्यामध्ये हेल्दी फॅट्स देखील आढळतात, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हे स्ट्रोक, मधुमेह आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. यामध्ये व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
1. मनुके
फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे, मनुका पचन सुधारण्यास मदत करते. हे आतड्याच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
2. खजूर
खजूरमध्ये अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे फ्री रॅडिकलचे नुकसान कमी करण्यास मदत करतात आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात. अँटी-ऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे, ते आपल्या त्वचेसाठी देखील निरोगी आहे. त्यामध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात आढळते, जे तुमच्या हृदयासाठी आणि आतड्यांसाठी फायदेशीर आहे. फायबर खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
3. अक्रोड
यामध्ये ओमेगा-3 आढळते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. तुमची आंतडे निरोगी ठेवण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे, ज्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते.
4. बदाम
बदाम खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते. याबरोबरच हे ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही फायदेशीर आहे. ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते. हिवाळ्यात अनेकदा आपले वजन वाढते, त्यातही बदाम फायदेशीर आहे. हे तुमची भूक नियंत्रित करते, ज्यामुळे तुमचे वजन वाढत नाही.
5. पिस्ता
पिस्त्यात फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे वजन कमी करण्यास मदत करते. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. त्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट आढळतात, जे पेशींच्या नुकसानापासून संरक्षण करतात. याशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :