Health Tips : उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक? हे सत्य की असत्य?; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Drinking Water : अनेकांना बसून पाणी पिण्याची सवय असते. तर काहींना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते.

Drinking Water : आपल्या शरीरासाठी पाणी (Water) पिणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात शरीरातील निम्मे आजार पुरेसे पाणी प्यायल्याने कमी होतात. पाणी पिणं जरी महत्त्वाचं असलं तरी हे पाणी तुम्ही कसे पिता यावर देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. अनेकांना बसून पाणी पिण्याची सवय असते. तर काहींना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण ही सवय शरीराला आतून नुकसान करते. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, हे एक मिथक आहे. पण आयुर्वेदात असे मानले जाते की, उभे राहून पाणी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. इतकेच नाही तर योगासनांमध्ये असे मानले जाते की, उभे राहून पाणी पिण्याच्या प्रक्रियेचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.
उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो, पचनसंस्थेवर दबाव येतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन होते, त्यामुळे बसून पाणी हळूहळू प्यावे असा सल्ला दिला जातो. उभं राहून पाणी पिण्याने आणखी काय परिणाम होतो या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
किडनीवर दबाव :
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उभे राहून पाणी प्यायल्याने किडनीवर दबाव पडतो ज्यामुळे किडनीचे आजार वाढू शकतात. त्यामुळे किडनीच्या रुग्णांनी आरामात बसून पाणी प्यावे.
फुफ्फुसावर दाब पडतो
उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुसावर दाब पडतो ज्यामुळे फुफ्फुसे पूर्णपणे उघडू शकत नाहीत. त्यामुळे श्वसनसंस्थेवर परिणाम होतो. पोटात साचलेल्या पाण्यामुळे फुफ्फुसाच्या खालच्या भागावर दाब पडतो, त्यामुळे फुफ्फुसे आकुंचन पावतात.
सांधेदुखीचा त्रास
तज्ज्ञांचे मत आहे की, जर एखाद्याला गुडघे, नितंब किंवा कंबरदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी उभे राहून पाणी पिऊ नये. उभे असताना पाणी प्यायल्याने सांध्यांवर अतिरिक्त दबाव पडतो, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सांध्याचे आजार असलेल्यांनी आरामात बसून पाणी प्यावे. बसून पाणी प्यायल्याने सांध्यावरील दाब कमी होऊन सांध्यांना आराम मिळेल.
पचनक्रियेवर परिणाम
उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस साठतो जो पचनसंस्थेसाठी हानिकारक आहे. त्यामुळे आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
