Health Tips :100 वर्ष जगणारे लोक नाश्त्यामध्ये काय खातात? तुम्हीही नाश्याला 'हे' पदार्थ निवडा!
Health Tips : जगात सर्वाधिक काळ जगणाऱ्या लोकांना ब्ल्यू झोनमधील लोक म्हटले जाते.
Health Tips : निरोगी जीवनशैली आणि चांगला आहार कोणाला हवा नसतो? प्रत्येकालाच सुंदर आणि दीर्घायुष्य जगायचं असतं. मात्र, कामाचा वाढता ताण आणि अयोग्य आहार यामुळे अनेकदा आयुष्याचं गणित बिघडतं. मात्र, तुम्हाला माहीत आहे का..या जगात असेही काही लोक आहेत जे सर्वाधिक काळ किंवा 100 वर्षांहूनही अधिक काळ जगले आहेत आणि जगतायत. हे लोक इतके वर्ष कसे जगतात? यांचा आहार नेमका कोणता असतो? याबाबत तुम्हालाही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर याबाबत आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत.
100 वर्ष जगतात लोक
जगात सर्वाधिक काळ जगणाऱ्या लोकांना ब्लू झोनमधील लोक म्हटले जाते. ब्ल्यू झोनमध्ये राहणारे अधिकतर लोक 100 वर्षांहून अधिक काळ जगणारे असतात. जगभरात इटली, ग्रीस, कोस्टा रिका, जपान, आणि कॅलिफोर्निया सारख्या भागांत लोकांचं वयोमान 100 वर्षांहून अधिक काळ असते.
स्पेशल डाएटचा आहारात समावेश
जे लोक 100 वर्षांहून अधिक काळ जगतात त्यांचा आहार देखील हेल्दी आणि पौष्टिक असतो. हे लोक आपल्या डाएटमध्ये अशा पदार्थांचा समावेश करतात ज्यामुळे त्यांचं वय वाढण्यास किंवा त्यांना दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. चला तर मग जाणून घेऊयात ब्ल्यू झोनमधील लोकांचा आहार नेमका कसा असतो?
1. पॉपकॉर्न
अनेकदा आपण थिएटमध्ये सिनेमा बघताना किंवा घरी मॅच बघत असताना टाईमपास म्हणून पॉपकॉर्न्स चघळत असतो. मात्र, ब्लू झोनमधील लोक हे डेयरी प्रोडक्ट्स पासून फार लांब असतात. त्यांच्या आहारात या दही, पनीर, ताक यांसारख्या पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश नसतो. याऐवजी ते नाश्त्यात पॉपकॉर्नचा समावेश करतात. पॉपकॉर्नमध्ये एन्टीऑक्सिडेंट आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात.
2. बेबी सोयाबीन
तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात बेबी सोयाबीनचा देखील समावेश करू शकतात. बेबी सोयाबीनला तुम्ही वाफवून, साल सोलून किंवा तळून देखील खाऊ शकता. याचं सेवन केल्याने तुमचं फॅट आणि कॅलरीज कमी होतील. प्रोटीन, फायबर आणि आवश्यक व्हिटॅमिन्स यामध्ये असतात.
3. छोले
कडधान्य हा देखील ब्लू झोनमधील लोकांचा मुख्य आहार आहे. यामुळे हे लोक छोले देखील आपल्या आहारात समावेश करतात. छोलेंना तुम्ही ऑलिव्ह ऑईलमध्ये लाईट फ्राय करून त्यात जिरे, मिरची पावडर, लाल मिरची पावडर घालून खाऊ शकता.
4. ड्रायफ्रूट्स
काजू, बदाम, अक्रोट, मनुके, जर्दाळू यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स तसेच मिनरल्स असतात. यामुळे स्मरणशक्ती देखील चांगली राहते. ब्लू झोनमधील लोक ड्रायफ्रूटचं सेवन आवर्जून करतात.
5. फळं
ब्लू झोनमधील लोक आपल्या नाश्त्यात फळांचा देखील तितकाच समावेश करतात. तुम्ही सुद्धा तुमच्या आहारात सफरचंद, ब्लूबेरी, द्राक्ष, किवी, अननस आणि नाशपती यांसारख्या फळांचा तुमच्या नाश्त्यात नक्की समावेश करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :