Health Tips : दररोज कॉफीचे सेवन हृदयासाठी चांगले? जाणून घ्या तज्ञांचं म्हणणं
Health Tips : नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसातून दोन ते तीन कप कॉफी पिणे हृदयासाठी फायदेशीर आहे.
Health Tips : तुम्ही कॉफी (Coffee) प्रेमी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकांना दिवसातून सहा ते सात वेळा कॉफी पिण्याची सवय असते. परंतु, जास्त कॉफीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? यासाठी नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसातून दोन ते तीन कप कॉफी पिणे हृदयासाठी फायदेशीर आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या 71 व्या वार्षिक वैज्ञानिक सत्रात सादर केलेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, हा ट्रेंड हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी त्रस्त असलेल्या आणि नसलेल्या लोकांसाठी आहे.
संशोधकांनी सांगितले की, कॉफी बिघडत असलेल्या हृदयविकाराशी संबंधित नाही. तर ही प्रत्यक्षात हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. "कॉफीमुळे हार्टबिट्स वाढू लागतात. त्यामुळे काही लोकांना याचे सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढू शकतो अशी काळजी वाटते. परंतु हा डेटा असे सुचवतो की, "दररोज दोन ते तीन कप कॉफी प्यायल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो. कॉफी पिणाऱ्या लोकांचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे मृत्यू होण्याचा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो. रिसर्चमध्ये असे मांडण्यात आले आहे की, योग्य प्रमाणात कॉफी पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे."
सर्वसाधारणपणे, दिवसातून दोन ते तीन कप कॉफी पिणे हे सर्वात फायदेशीर मानले जाते. कारण यामुळे हृदयरोग, हृदयाशी संबंधित अन्य आजार यापासून होणारा धोका 10 ते 15 टक्के कमी होतो. दिवसातून एक कप कॉफी पिणाऱ्या लोकांमध्ये स्ट्रोक किंवा हृदयाशी संबंधित मृत्यूचा धोका सर्वात कमी आढळतो.
कॉफीपासून अन्य कोणते फायदेल मिळू शकतात हे ही जाणून घ्या
कॉफीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे मॅटाबॉलिजम चांगले होते. तसेच कॉफीमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या उर्जेमुळे वजन कमी होते. कॉफी मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी तसेच हार्टची समस्या असणाऱ्या लोकांसाठी फायदेशिर ठरते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Gudi Padwa Wishes 2022 : गुढीपाडव्याला तुमच्या प्रियजनांना 'या' शुभेच्छा देऊन सणाचा आनंद द्विगुणित करा
- Gudi Padwa 2022 : यंदाच्या गुढीपाडव्याचा 'हा' आहे शुभमुहूर्त, जाणून घ्या पूजा, तिथी आणि धार्मिक महत्त्व
- Important Days in April 2022 : एप्रिल महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )