एक्स्प्लोर

Health Tips : चविष्ट 'कॉर्नफ्लेक्स' आरोग्यासाठी नुकसानकारक; शरीरात 'या' समस्या उद्भवू शकतात

Cornflakes Health Tips : काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉर्नफ्लेक्समध्ये आपल्या शरीराला आवश्यक तेवढे पोषण नसते. त्यात फायबरचे प्रमाणही कमी असते.

Cornflakes Health Tips : अनेकांना सकाळी उठून शाळा आणि ऑफिसला जाण्यापूर्वी कॉर्नफ्लेक्स खायला आवडतात. कारण हा एक झटपट आणि आरोग्यदायी नाश्ता आहे. तुम्हीही या लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. हार्वर्डमधील एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, कॉर्नफ्लेक्समध्ये साखर आणि मीठ जास्त असते, ज्यामुळे मधुमेह, फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणा तसेच उच्च रक्तदाब आणि शरीरात जळजळ होऊ शकते. 

आजकाल लोक घरच्या स्वयंपाकापेक्षा बाहेरच्या अन्नावर जास्त अवलंबून आहेत. यामुळेच कॉर्नफ्लेक्स हा आपल्या आहाराचा अत्यावश्यक भाग बनला आहे. पण ते खाण्याचे अनेक तोटे आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. कॉर्नफ्लेक्स हेल्दी बनवण्यासाठी बहुतेक लोक त्यात मिक्स फ्रूट, स्ट्रॉबेरी, मध आणि बदाम घालतात. कॉर्नफ्लेक्स फक्त मक्याच्या पिठापासून बनवले जातात असे म्हणतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.

कॉर्नफ्लेक्समध्ये जास्त पोषण नसते

काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कॉर्नफ्लेक्समध्ये आपल्या शरीराला आवश्यक तेवढे पोषण नसते. त्यात फायबरचे प्रमाणही कमी असते. या कारणास्तव, आपल्याला लवकरच भूक लागायला लागते. शरीराला योग्य प्रमाणात फायबर मिळणे फार महत्वाचे आहे. कारण त्यामुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक

डॉ. फ्रँक हू यांच्या मते, कॉर्नफ्लेक्समधील साखर आणि मीठ उच्च रक्तदाब आणि जळजळ, मधुमेह, फॅटी लिव्हर आणि लठ्ठपणाचे कारण बनते. त्याच्या वापरामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका असतो. कॉर्नफ्लेक्स हे पॅकेज केलेले अन्न आहे, जे सहसा दूध आणि साखर मिसळून खाल्ले जाते. कॉर्नफ्लेक्स खाल्ल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो. याचे कारण असे की त्याचे उच्च जीआय सुमारे 93 आहे, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अजिबात चांगले नाही. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो त्यामुळे कॉर्नफ्लेक्सचे कमी सेवन करावे. यामुळे तुम्हालाच याचा फायदा होणार आहे. तुम्ही ओट्सचाही नाश्त्यात वापर करू शकता. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Money Plant : घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
घरात 'मनी प्लांट' लावल्याने खरंच पैसा येतो का? जाणून घ्या वास्तू अन् विज्ञानातील सत्य
Tea Side Effects : तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
तुम्हीही रोज सकाळी उपाशीपोटी चहा पिता? जरा सांभाळून... आरोग्याचं होऊ शकतं भयंकर नुकसान!
Health Tips : पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
पावसाळ्यात वाढतोय हिपॅटायटिसचा धोका; यकृताच्या आरोग्यासाठी ‘प्रतिंबध’ हाच उपाय
Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime love Triangle: गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
गौरवचा पांढरा शर्ट लाल रंगाने माखून गेला, एका मुलीसाठी दोन गुंड रस्त्यावर झुंजले, नागपूरच्या सुंदरबनमध्ये लव्ह ट्रँगलचा हादरवणारा शेवट
Nashik Crime News: 'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
'तिने मला प्रेमात फसवलं, हवी तेवढी कॅश काढून घेतली अन्...', नाशिकमध्ये प्रियकरानं संपवलं जीवन, 'शेवटच्या चिठ्ठी'त म्हणाला तिला शिक्षा करा
High Court Nagpur: रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू झाल्यास भरपाई नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
Abijeet Dipke Visit Latur ZP School : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता अभिजीत दिपकेंनी दादा भुसेंकडे मोर्चा वळवला, शाळांची अवस्था पाहून म्हटलं, 'नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा...'
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Team India WTC Scenarios Marathi News: WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
WTC च्या गुणतालिकेत भारत अजूनही पाचव्या स्थानावर; उरलेल्या 8 पैकी किती सामने जिंकावे लागणार?, फायनलमध्ये पोहोचण्याचं संपूर्ण समीकरण!
Sugar Price Hike: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Embed widget