Plum Benefits : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास आलू बुखारा गुणकारी; वाचा अनेक फायदे
Plum Nutrition : आलू बुखारा अनेक प्रकारच्या हृदयरोगांपासून दूर राहण्यास मदत करतो. आलू बुखारा खाण्याचे इतर फायदे जाणून घ्या.
Plum Nutrition : सिझनल फळं खायला बहुतेक सगळ्यांनाच आवडतात. फळांचे अनेक शारीरिक फायदेही आपल्याला माहित आहे. पण याच फळांपैकी एक फळ म्हणजे आलूबुखारा. इंग्रजीमध्ये त्याला प्लम (Plum) असे म्हणतात. चवीला आंबट गोड असणारे हे फळ सगळ्यांनाच आवडेल असे नाही. परंतु. आलू बुखारा या फळात मात्र अनेक व्हिटॅमिन्सचा समावेश असतो. आलू बुखारा तुम्हाला अनेक प्रकारच्या हृदयरोगांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. चला तर जाणून घेऊयात आलू बुखाराचे फायदे.
1. वजन कमी करण्यास फायदेशीर : आलू बुखाराचा सर्वात महत्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे आलू बुखाराच्या सेवनाने तुमचे वजन नियंत्रित राखण्यास मदत होते. या फळामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. या फळामध्ये सुपरऑक्साइड देखील असते जे शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते.
2. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त : आलू बुखाराचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. कोरोना काळात अनेकांची रोगप्रतिकारकशक्ती कमी झाली होती. अशा वेळी आलू बुखारा हा तुमच्या शरीरासाठी उत्तम मानला जातो.
3. बद्धकोष्ठतेची तक्रार होईल दूर : आलू बुखाराच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होते. याच्या सेवनाने डोळ्यांच्या समस्याही दूर होतात. म्हणूनच तुम्ही आलू बुखाराचे सेवन करू शकता.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या इतर बातम्या :