Health Tips : हिवाळ्यात खजूर खाणं आरोग्यासाठी फायदेशीर; वाचा खजुराचे फायदे
Dates Benefits : खजूर हिवाळ्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, हिवाळ्यात होणार्या अनेक समस्या दूर करण्यासाठी हे उपयुक्त आहे.
Dates Benefits : हिवाळा सुरू होताच बाजारात खजूर दिसू लागतात. खजुराच्या सेवनाने शरीराला ऊब मिळते, यातील पोषक तत्वे तुम्हाला एक नाही तर अनेक समस्यांपासून वाचवतात. तसेच हिवाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासूनही दूर राहता येते. खजुरापासून कोणते फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊया.
हाय बीपीमध्ये प्रभावी : हिवाळ्यात तापमान कमी असते त्यामुळे रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकसतात त्यामुळे रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही आणि अशा स्थितीत रक्तदाब वाढतो. जर तुम्हाला हिवाळ्यात हाय बीपी नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही रोज खजूर खाणं गरजेचं आहे. खजूरमध्ये पोटॅशियम आढळते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी आहे.
मधुमेहावर नियंत्रण ठेवा : हिवाळ्यात मिठाई खाण्याची फार इच्छा होते. अशा वेळी मधुमेह वाढण्याचा धोका असतो, त्यामुळे खजुराचे रोज सेवन करावे. खजूर गोड असले तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर आहे, कारण ते यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते
अॅनिमिया दूर होतो : हिवाळ्यात अॅनिमियाची तक्रार करणारे अनेक लोक आहेत. असे लोक खजुराच्या मदतीने अॅनिमियावर मात करू शकतात, खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळते, त्यात असलेले फायबर आणि व्हिटॅमिन सी हे पोषक तत्व आहेत जे शरीरात लोह शोषण्यास मदत करतात.
हाडे मजबूत ठेवा : हिवाळ्यात स्नायू आणि हाडांचा त्रास होतो. लोक वेदनांनी त्रस्त होतात, अशा परिस्थितीत खजूर खावे कारण त्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियमचे भांडार आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. सांधेदुखीच्या रुग्णांना हिवाळ्यात जास्त त्रास होतो, यासाठी त्यांनी रोज किमान दोन खजूर खावेत.
सर्दी-खोकल्यापासून रक्षण करते : हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास लोकांना होतो, ही लक्षणे दूर करण्यासाठी खजूर खूप प्रभावी आहेत. यामध्ये असलेल्या सर्व पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकला टाळता येतो.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर : हिवाळ्यात अनेकदा बद्धकोष्ठतेच्या समस्येने लोक हैराण होतात. अशा परिस्थितीत तुम्ही प्रथिने आणि फायबरने समृद्ध खजूर खावे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून सकाळी खा, यामुळे तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :