Camphor: पूजेसाठी वापरला जाणारा कापूर शरीरासाठी आहे फायदेशीर काय आहेत फायदे
Health Benefits Of Camphor : कापूर शरीरासाठी सुद्धा फार महत्वाचे काम करतो. अँटीऑक्सीडंट (ANTI-OXIDENTS) घटकामुळे हे शरीराच्या अनेक समस्या दूर करते.
Health Benefits Of Camphor : रोजच्या जीवनात आपल्या शरीराबद्दल अनेक तक्रारी उद्भवतात. या तक्रारींचे आपल्याच घरात बरेच नैसर्गिक (NATURAL) उपाय असतात. त्यापैकीच एक म्हणजे कापूर (CAMPHOR). कापूर आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो. शरीराच्या अनेक समस्या या कापराच्या वापराने बऱ्या होऊ शकतात. सुरूवातीपासूनच हिंदू धर्मात कापूर वापरण्याची परंपरा आहे. साध्या पूजेपासून ते एखाद्या मोठ्या यज्ञामध्ये कापूर वापरला जातो. हिंदू समाजात असे मानले जाते की, घरात कापूर जाळला तर सुख-शांती आपल्या घरात नांदते. तसेच घरातील वातावरण ही शुद्ध राहते. कापराचा वास घरातील किटाणु तसेच बॅक्टेरीया नष्ट करते. ज्याप्रमाणे प्रमाणे कापूरचा वापर पूजेत केला तर त्याचे अनेक फायदे घराला होतात. त्याचप्रमाणे कापूर शरीरासाठी सुद्धा फार महत्वाचे काम करतो. अँटीऑक्सीडंट (ANTI-OXIDENTS) घटकामुळे हे शरीराच्या अनेक समस्या दूर करते. आयुर्वेदात कापराचे खूप जास्त महत्व सांगितले गेले आहे. जाणून घेऊया याचे फायदे.
श्वसनाच्या अनेक आजारांपासून सुटका
कापूर घशाला आलेली सूज कमी करण्यास मदत करते. तसेच बरेच वर्ष असलेला जुना खोकला घालवण्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता. सोबतच श्वसनांच्या अनेक आजारांपासून तुमची सुटका होऊ शकते.
वेदनांपासून आराम मिळू शकतो
वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कापराचा वापर केला जावू शकतो. जखमेवर कापूर लावला असता होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. तसेच सांधेदुखीवरचे एकमेव नैसर्गिक उपाय म्हणजे कापूर. पाण्यात कापूर मिक्स करून लावला तर झालेली जखम लगेच भरून येते.
खाज कमी होते
शरीरावर कोठेही खाज सुटली असेल तर कापूर त्यावर फार परिणामकारक ठरू शकतो. नारळाच्या तेलात कापूर मिसळून तो लावला तर खाज लगेच कमी होऊ शकते.
ब्लड प्रेशर नियंत्रीत राहते
ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्यासाठी कापूर फायदेशीर आहे. नियमीत वाढणाऱ्या आणि कमी होणाऱ्या ब्लड प्रेशरसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
केसातील कोंड्यावर प्रभावी उपाय
केसांच्या अनेक समस्या या कापराच्या वापराने कमी होऊ शकतात. नारळाच्या तेलात कापूर मिसळून रोज केसांना लावले तर केसातील कोंढा कमी होण्यास मदत होते.
महत्वाच्या इतर बातम्या
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )