(Source: Poll of Polls)
Belly Fat after Pregnancy : प्रसूतीनंतर महिलांचे पोट का वाढते? वाढलेलं वजन कमी कसं करायचं? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Belly Fat after Pregnancy : गर्भधारणेनंतर वजन वाढणे आणि पोटावरील चरबी वाढण्याची समस्या महिलांमध्ये सामान्य असते. मात्र, वेळीच नियंत्रण न केल्यास तुमच्या सौंदर्यावर देखील परिणाम होऊ शकतो.
Belly Fat after Pregnancy : आई झाल्यानंतर कोणत्याही महिलेचे आयुष्य पूर्णपणे बदलते. या काळात स्वतःसोबतच तुम्हाला तुमच्या बाळाचीही विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, गर्भधारणेनंतर अनेक महिलांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषतः गर्भधारणेनंतर महिलांमध्ये पोटाची चरबी वाढू लागते. पोटाची चरबी ही एक सामान्य समस्या आहे. गर्भधारणेनंतर अनेक महिलांना पोटाची चरबी वाढण्याची समस्या जाणवू लागते. अनेक महिला आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन यातून सुटका करून घेतात. मात्र, काही महिलांना ही स्थिती दिर्घकाळ जाणवते. अशा वेळी या स्थितीतून कशी सुटका होणार या विचाराने अनेक महिला त्रस्त असतात. प्रसूतीनंतर पोटाची चरबी कशी कमी करावी या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
प्रसूतीनंतर पोटातील चरबीची समस्या
गर्भधारणेदरम्यान, महिलांच्या गर्भाशयाचा आकार वाढतो. प्रसूतीनंतरही गर्भाशयाचा आकार वाढतच राहतो त्यामुळे पोट फुगलेले दिसते. वेळेत व्यायाम आणि योग्य खाण्याच्या सवयी लागल्यास हळूहळू पोटाटी वाढलेली चरबी कमी होत जाते. या प्रक्रियेला इन्व्हॉल्यूशन म्हणून ओळखले जाते.
प्रसूतीनंतर पोटाची चरबी कशी कमी करावी?
तज्ज्ञांच्या मते, महिलांनी व्यायामासाठी जास्त वेळ घेऊ नये. मात्र, गर्भधारणेच्या दोन दिवसांनंतरच तुम्ही हलका व्यायाम सुरू करू शकता. यालाच आयसोमेट्रिक आकुंचन म्हणतात. हा व्यायाम केल्याने ओटीपोटाचा भाग, पोट आणि पाठीचा खालचा भाग मजबूत होतो. असे व्यायाम प्रसूतीच्या 4 ते 6 आठवड्यांनंतरच सुरू करता येतात. जेणेकरून तुमच्या शरीरावर कोणताही दबाव येणार नाही. बहुतेक व्यायामांसाठी, पाठीचा, ओटीपोटाचा आणि पोटाच्यावर असलेला हलका व्यायामच करा. तुम्ही शरीर आणि मान ताठ करणारे व्यायाम देखील करू शकता.
व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी एकदा खात्री करून घ्या. आठवड्यातून 2-3 वेळा हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीच्या व्यायामाबरोबरच शरीर स्ट्रेच करण्यावर भर द्या. व्यायामाबरोबरच चालणेही खूप महत्त्वाचे आहे. भरपूर पाणी प्या आणि आहाराची विशेष काळजी घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
Pregnancy Health Tips : गरोदरपणात वारंवार भूक लागतेय? हे 'सुपर स्नॅक्स' खा आणि हेल्दी राहा