Health Tips : भिजवलेले, भाजलेले की सुके? आयुर्वेदानुसार ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा सविस्तर
Dryfruits Health benefits : आयुर्वेदानुसार ड्रायफ्रूट्स हे ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वांचा मौल्यवान स्त्रोत मानले जातात.
Dryfruits Health benefits : निरोगी राहण्यासाठी अनेकजण अनेक उपाय करतात. निरोगी राहण्यासाठी चांगले अन्न खूप महत्वाचे आहे. यामुळेच लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करतात. ड्रायफ्रूट्स (Dryfruits) हे यापैकीच एक आहेत. ड्रायफ्रूट्सच्या भरपूर गुणधर्मांमुळे आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे आहेत. इतकेच नाही तर, आयुर्वेदानुसार ड्रायफ्रूट्स हे ऊर्जा आणि आवश्यक पोषक तत्वांचा मौल्यवान स्त्रोत मानले जातात.
असे मानले जाते की, ड्रायफ्रूट्स वात, पित्त आणि कफ संतुलित करतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात. आयुर्वेदानुसार ड्रायफ्रूट्स खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते जाणून घेऊयात.
बदाम
भिजवलेले आणि सोललेले बदाम संधिरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर असू शकतात. पित्त असलेल्या लोकांनी बदाम भिजवून खावेत. तसेच, कफ असलेल्या लोकांसाठी, बदाम हा चांगला मार्ग आहे.
अंजीर
अंजीरात पौष्टिक आणि गोड असतात आणि वातग्रस्त लोकांमध्ये वात कोरडेपणा संतुलित ठेवण्यास मदत करतात. अंजीर थोडे उष्ण असू शकते, त्यामुळे पित्त असलेल्या लोकांनी ते कमी प्रमाणात सेवन करावे. ते गोड आणि जड देखील असतात, जे जास्त प्रमाणात खाल्ल्यास कफ वाढू शकतो.
काजू
वात प्रबळ लोकांसाठी काजू उत्तम आहेत. काजू वातांचे गुणधर्म संतुलित ठेवण्यास मदत करतात. खोकल्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी, काजू ही समस्या आणखी वाढवू शकते, म्हणून काजूचं सेवन कमी प्रमाणात केले पाहिजे.
खजूर
पोषक तत्वांनी युक्त खजूर वात असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. यातील कॅथर्टिक गुणधर्मांमुळे वात संतुलित करण्यास मदत होते. खजुराचं मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास ते गरम होऊ शकतात. खजूर जड आणि गोड असतात, त्यामुळे खोकल्याचा त्रास असलेल्यांनी हे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
अक्रोड
ज्या लोकांना वाताचा त्रास आहे. अशा लोकांनी अक्रोड कमी प्रमाणात खावेत. कारण त्यात किंचित तुरट गुणधर्म असतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. अक्रोड हे उष्ण आणि पौष्टिक स्वरूपाचे असल्याने ज्यांना पित्ताचा त्रास आहे. त्यांनी अक्रोड खाऊ नयेत. याशिवाय ते जड आणि तेलकटही असतात, त्यामुळे कफचा त्रास असलेल्या लोकांनी देखील अक्रोड खाऊ नयेत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :