Health Tips : तुम्हीही भावनांमध्ये वाहून जाता का? 'या' 5 पद्धती वापरून पाहा
Health Tips : जेव्हा नकारात्मक विचारांचा ताबा घेतात तेव्हा तुमचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.
Health Tips : व्यस्त जीवनशैलीमध्ये आजकाल भावनांना धोका आहे. नातेसंबंध एकत्र ठेवण्यासाठी आपल्या भावना समजून घेणे आणि त्यांना कंट्रोल करणे खूप महत्वाचे आहे. कधीकधी अशा मोठ्या भावना असतात ज्या नियंत्रित करणे कठीण असते. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास अनेक समस्या आपोआप सुटतात. जर तुमचा तुमच्या भावनांवर ताबा नसेल तर त्यामुळे अनेक गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात.
या संदर्भात बेंगळुरू येथील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील मानसशास्त्रज्ञ डॉ. जे. सुब्बुराज आणि योगसूत्र होलिस्टिक लिव्हिंगच्या सीईओ-संस्थापक शिवानी बाजवा म्हणतात की, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने तुम्ही अनेक प्रकारच्या समस्या टाळू शकता. आपल्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात ज्या दरम्यान आपण भावनांमध्ये वाहून जातो. कोणत्या पाच मार्गांनी तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
दीर्घ श्वास घ्या
आरोग्य तज्ज्ञ शिवानी बाजवा सांगतात की, कधीकधी एखाद्याला इतका राग येतो की, भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. अशा स्थितीत दीर्घ श्वास घ्या. त्यामुळे तणाव कमी होईल आणि भावनांवरही नियंत्रण राहील. रोज प्राणायाम किंवा ध्यानाचा सराव करा.
रोजनिशी लिहा
तुमच्या भावना आणि त्यांचे ट्रिगर शोधण्यासाठी रोजनिशी लिहिणे सुरू करा. हे दररोज केल्याने तुमच्या प्रतिक्रिया समजण्यास मदत होऊ शकते.
नकारात्मकता पुनर्स्थित करा
जेव्हा नकारात्मक विचार तुमच्या मनावर ताबा गाजवण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा तुमचे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. चुका किंवा अडचणींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुमचे लक्ष सकारात्मक पैलूंवर केंद्रित करा. सकारात्मक विचार परिणामांना आकर्षित करतो.
शारीरिक व्यायाम करा
व्यायाम हा सर्वोत्तम स्ट्रेस बस्टर मानला जातो. जेव्हा जेव्हा तुमच्या भावना बाहेर येतात आणि तुम्ही अस्वस्थ असाल तेव्हा व्यायाम करा. तुम्ही सायकलिंग आणि डान्स सारखे हलके व्यायाम करू शकता.
डॉक्टरांचा सल्ला घ्या
अनेकदा आपण अनेक प्रयत्न करूनही भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. अशा वेळी अनेक उपाय करूनही हतबल झाल्यासारखे वाटत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.