Health : काय सांगता! नवरात्रीत वजन झटपट कमी होईल, हो हे खरंय! फक्त न्यूट्रिशनिस्टने दिलेल्या टिप्स फॉलो करा
Health : चैत्र नवरात्रीमध्ये योग्य पदार्थ खाऊन आणि काही खाद्यपदार्थ टाळून वजन कसे कमी करता येईल याबद्दल आहारतज्ञांनी दिलेला सल्ला जाणून घ्या
Health : आपल्या देशात अनेक लोक नवरात्रीत अगडी कडक उपवास ठेवतात. अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात तर काही लोक उपवासासाठी पहिला आणि शेवटचा दिवस निवडतात. तर काही लोक 9 दिवस फक्त फलाहार घेतात. तर काही लोक विविध खाद्यपदार्थ खाऊन उपवास करतात. चैत्र नवरात्री 9 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे. ही नवरात्री नवमीच्या दिवशी म्हणजेच 17 एप्रिल रोजी कन्या पूजनाने समाप्त होईल. नवरात्रीच्या उपवासाबद्दल सांगायचे तर, जे लोक फलाहार घेतात, ते लोक बाजरी, गव्हाचे पीठ, साबुदाणा, राजगिरा, शिंगाड्याचे पीठ यापासून बनवलेल्या गोष्टी खातात. याशिवाय बटाटा, रताळे, भोपळा, पालक, दुधी, काकडी, गाजर आणि सर्व फळांचाही फळांच्या आहारात समावेश करता येईल.
उपवासात काय खाऊ नये?
नवरात्रीच्या उपवासात गहू, तांदूळ, रवा, मैदा, कॉर्न फ्लोअर, बीन्स आणि कडधान्ये खाणे निषिद्ध मानले जाते. उपवासाच्या दिवसांत फळे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास वजन योग्य पद्धतीने कमी करता येते. त्याच वेळी, तज्ज्ञांचे असे मत आहे की, या उपवासाचे अनेक फायदे आहेत.
उपवासाचे फायदे
न्यूट्रिशनिस्ट डॉ. मेघना पासी म्हणतात, 'आध्यात्मिकते सोबतच, योग्य मार्गाने उपवास केल्याने याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. संशोधनात असे दिसून आले आहे की चरबी जाळण्यात आणि वजन कमी करण्यासाठी उपवास खूप उपयुक्त ठरतो. याशिवाय उच्च कोलेस्टेरॉल, हृदयविकार, उच्च रक्तदाब यांसारखे आजारही उपवासात मर्यादित अन्न सेवन करून सुधारता येतात. उपवासाच्या वेळी आपले शरीर आरामदायी अवस्थेत असते, जे आपल्या पचनसंस्थेला शरीरातील डिटॉक्स प्रक्रिया सुरू करण्यासाठी आणि आतडे स्वच्छ करण्यासाठी संकेत देते. डॉ. पासी यांनी नवरात्रीचे उपवास करण्याचे काही मार्ग सांगितले जे वजन कमी करण्यास मदत करू शकतात.
उपवासात काय खावे?
उपवासाच्या वेळी, तांदूळ आणि गहू यांसारखे दैनंदिन धान्य खाल्ले जात नाही, इतर धान्य जसे की गव्हाचे पीठ, शिंगाड्याचे पीठ, राजगिरा पीठाचा वापर करतात. त्यांच्या पुरी, भजी, वडे किंवा हलवा बनवण्याऐवजी खिचडी किंवा रोटी बनवून खा. यामुळे, अतिरिक्त कॅलरीज शरीरात प्रवेश करणार नाहीत.
बटाटा फ्राईज ऐवजी उकडलेले बटाटे
तळलेले बटाटे खाल्ल्यास चव चांगली लागते, पण त्यात भरपूर कॅलरीज असतात. त्यामुळे बटाटे तळण्याऐवजी ते उकळून खाऊ शकता किंवा त्याऐवजी फळे खाऊ शकता.
भरपूर फळं खा
भरपूर फळे खा, कारण ते केवळ तुम्हाला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरच देत नाहीत तर तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात.
कंदमुळे खा
बरेच लोक त्यांच्या आहारात बटाटा, रताळे, भोपळा, यांसारख्या कंदमुळे भाज्यांचा समावेश करतात, जो एक चांगला पर्याय आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन बी, मिनरल्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. परंतु यामध्ये जास्त कॅलरीज असतात, त्यामुळे ते मर्यादित प्रमाणात खा.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खा
प्रथिने आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकता. यासाठी दूध आणि दुग्धजन्य पदार्थ जसे दही, ताक आणि चीज, तूप यांचा आहारात समावेश करता येईल.
चहा आणि कॉफी टाळा
चहा/कॉफी प्यायल्याने शरीर निर्जलीकरण होते आणि उन्हाळा असेल तर अशक्तपणा येऊ शकतो. त्यामुळे चहा-कॉफीऐवजी नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक, मिल्कशेक किंवा साधे पाणी घ्या.
साखर कमी खा
खीर आणि हलव्यामध्ये प्रक्रिया केलेली साखर वापरणे टाळा. उपवासात तुम्ही जे काही बनवता, त्यात तुम्ही खजूर, मध, दालचिनी आणि गोडपणासाठी ताजी फळे घालू शकता. पांढरी साखर वापरणे टाळा.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health : ''अरे वा..अभिनेत्री सारखी परफेक्ट फिगर कशी मिळवलीस?'' काही नाही, तुमच्या दिनचर्येत फक्त 'हे' 5 बदल करा