(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy New Year 2024 : भारतात नवीन वर्ष एकदा नव्हे तर 5 वेळा साजरे करतात; जाणून घ्या यामागचं नेमकं कारण
Happy New Year 2024 : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागताची उत्सुकता सगळीकडे पाहायला मिळतेय.
Happy New Year 2024 : नवीन वर्ष (Happy New Year) सुरु व्हायला अवघा एक दिवस बाकी आहे. जगभरात नवीन वर्षाच्या स्वागताची अगदी जोरदार तयारी सुरु आहे. असं असलं तरी जगभरात प्रत्येकाची नवीन वर्ष साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. नवीन वर्षाची उत्सुकता ही एखाद्या सणापेक्षा कमी नाही. जगातील बहुतेक देशांमध्ये ख्रिश्चन नववर्ष साजरे करण्याची परंपरा आहे. ख्रिश्चन वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत 12 महिन्यांत विभागले गेले आहे. पण, जगभरातील विविध धर्मांचे पालन करणारे लोक वेगवेगळ्या तारखांना नवीन वर्ष साजरे करतात. मात्र, 1 जानेवारीला नवीन वर्ष जगाच्या कानाकोपऱ्यात साजरे केले जाते. पण, तुम्हाला माहित आहे का की भारतात एकदा नव्हे तर 5 वेळा नवीन वर्ष साजरे केले जाते.
ख्रिश्चन नवीन वर्ष
ख्रिश्चन नववर्ष हे 1 जानेवारीपासून साजरा केलं जाणार आहे. ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये या दिवसाचा उल्लेख करण्यात आला आहे. असे मानले जाते की ज्युलियस सीझरने 45 व्या वर्षी ई.स.पूर्व ज्युलियन कॅलेंडर तयार करण्यात आले. तेव्हापासून ख्रिश्चन नववर्ष साजरे करण्याची परंपरा आहे.
हिंदू नववर्ष
हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून केली जाते. नवीन संवत्सराही या दिवसापासून सुरू होतो. असे मानले जाते की, या दिवसापासून ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती सुरू केली. भारतातील अनेक भागांत गुढी पाडव्याचा सण साजरा केला जातो.
पंजाबी नवीन वर्ष
पंजाबमध्ये नववर्ष हा वैशाखी सण म्हणून साजरा केला जातो. वैशाखीचा हा सण मार्च किंवा एप्रिल महिन्यात साजरा केला जातो. या काळात सर्व गुरुद्वारांमध्ये जत्रेचं आयोजन केलं जाते.
जैन नवीन वर्ष
जैन समाजाचे लोक आपलं नवीन वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून साजरा करतात. याला वीर निर्वाण संवत असेही म्हणतात. या दिवसापासून जैन धर्मीय लोक आपलं नवीन वर्ष साजरे करतात.
पारसी नववर्ष
पारशी धर्माचे नवीन वर्ष नवरोज सण म्हणून साजरे केले जाते. नवरोज साधारणपणे 15 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जातो. शाह जमशेदजींनी 3 हजार वर्षांपूर्वी नवरोज साजरा करण्यास सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : सेलिब्रेशननंतर थोडा हलका आणि निरोगी नाश्ता हवाय? 'ही' रेसिपी वापरून पाहा