(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hair Care Tips : हेअर कलर केलाय पण तो जपायचा कसा प्रश्न पडलाय? 'या' काही सोप्या टिप्स
Hair Care Tips : जर तुम्ही केसांची नीट काळदी घेतली नाही तर तुमचा लूक खराब होऊ शकतो. शिवाय तुमचे केसही विचित्र दिसू लागतात.
Hair Care Tips : रंगीत, कलरफुल हेअर कलर सध्या बरेच ट्रेंडमध्ये आहेत. हेअर कलर (Hair Care Tips) केल्याने काही मिनिटांतच तुमचा लूक बदलतो शिवाय तुमचा कॉन्फिडन्स देखील वाढतो. यासाठी मोठ्या प्रमाणात तरूणाईची पसंती या हेअर कलर केसांना मिळते. केसांना हेअर कलर करणं तर सोपं आहे. पण, त्या केसांची योग्य काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही केसांची नीट काळदी घेतली नाही तर तुमचा लूक खराब होऊ शकतो. शिवाय तुमचे केसही विचित्र दिसू लागतात. त्यामुळे केसांना कलर केल्यानंतर केसांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ शॅम्पूपासून कंडिशनरपर्यंत काही महत्त्वाची खबरदारी घेण्याचा सल्ला देतात. या टिप्स नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात.
1. योग्य शॅम्पू निवडा
केसांना रंग दिल्यानंतर नेहमी सल्फेट फ्री शॅम्पू निवडा. हे शॅम्पू खास कलरफुल केसांसाठी तयार केले जातात.
2. आठवड्यातून दोनदा केस धुवा
केसांना रंग दिल्यानंतर वारंवार केस धुणं टाळा. कारण शॅम्पूमध्ये वापरण्यात आलेले केमिकल्स टाळूवर साचलेली घाण काढून टाकतात. पण, त्यामुळे केसांचा रंग निखळतो. यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुवा.
3. कोमट पाण्याने केस धुवा
केसांची मुळे आणि टाळू निरोगी ठेवण्यासाठी, हिवाळ्यातही केस खूप गरम पाण्याने धुवू नका. त्याऐवजी कोमट पाण्याने केस धुवा. गरम पाण्याने केस धुतल्याने केस कमकुवत होतात आणि तुटू लागतात. तसेच, केसांचा रंगही हलका होतो.
4. हेअर कलर शॅम्पूचा वापर करा
कलरफुल केसांसाठी वेगळ्या प्रकारचे शॅम्पू आहेत, ज्यामुळे तुमच्या हेअर कलरवर परिणाम होत नाही. यासाठी फक्त हेअर कलर शॅम्पूचाच वापर करा. त्यामुळे केस अधिक चमकदार दिसतात. तसेच, केसांना हेअर कलर केल्यानंतर कंडिशनरची करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घरी असलेला नॉर्मल कंडिशनर देखील केसांना लावू शकता.
5. केसांना तेल लावा आणि मसाज करा
केसांना निरोगी ठेवण्यासाठी तेल लावणं आणि मसाज करणं खूप महत्वाचं आहे. यासाठी खोबरेल तेल हा सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. केसांना तेल लावल्याने केसगळती कमी होईल तसेच, केसांची वाढ देखील होईल. यासाठी तेल थोडेसे कोमट करून केसांना लावा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.