Hair Care Tips : केसांतील कोंडा कायमचा होईल दूर; फक्त 'या' सोप्या टिप्स वापरून पाहा
Hair Care Tips : हिवाळ्यात कोरडी त्वचा आणि कोंड्याची समस्या खूप सामान्य आहे. त्यामुळे केसांना खाज येणे, कोरडेपणा येणे आणि केस गळणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
Hair Care Tips : हिवाळ्यात (Winter Season) केस (Hair) आणि त्वचेशी (Skin) संबंधित अनेक समस्या जाणवतात. यामध्ये, बहुतेक लोक कोरडी त्वचा (Dry Skin) आणि कोंडाच्या (Dandruff) समस्येने त्रस्त आहेत. त्यामुळेच या समस्येपासून सुटका होणं फार गरजेचं आहे. कारण याचा थेट परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. अशातच तुम्हाला जर कोंड्याची देखील समस्या जाणवत असेल तर दिवसभर तुमची चिडचिड होऊ शकते. कारण केसांतील कोंडा तुमच्या कपड्यांवर दिसू लागल्यास इतरांच्या नजरेत तो येऊ लागतो. तसेच, यामुळे तुमच्या केसांवरही परिणाम होतो. यामुळे केस कोरडे होऊ लागतात आणि केसगळती (Hairfall) सुरु होते.
बाजारात केसांतील कोंडा कमी करण्यासाठी अनेक प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पण, या प्रोडक्ट्समध्ये अनेकदा कॅमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो ज्यामुळे केसांचं नुकसान होतं. अशा वेळी घरात असलेल्या काही गोष्टी तुम्हाला कोंड्यापासून मुक्त करू शकतात.
'या' गोष्टींमुळे कोंडा दूर होऊ शकतो
कडुनिंब आणि आवळा हेअर पॅक
कडुनिंब आणि आवळा या दोन्हीमध्ये असलेले प्रतिजैविक गुणधर्म कोंडा हाताळण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याशिवाय यामध्ये असलेले पोषक घटक केसांना पोषण देतात. यासाठी तुम्हाला कडुलिंब आणि आवळा पावडर पाण्यात किंवा कोरफड जेलमध्ये मिसळून पेस्ट बनवावी लागेल. नंतर ही पेस्ट केसांना लावा, कमीतकमी 30 मिनिटे ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.
मेथीची पेस्ट
मेथीचे दाणे केसांसाठी फायदेशीर मानले जातात. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत, त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारीक करून पेस्ट बनवावी. पेस्ट तयार झाल्यानंतर, आपल्या टाळूवर लावा, नंतर काही वेळ ठेवल्यानंतर, केस शॅम्पूने धुवा. ही पेस्ट कोरडेपणा आणि खाज कमी करण्यास मदत करते.
कोरफड जेल
त्वचेबरोबरच कोरफड जेल केसांसाठीही फायदेशीर ठरते. यासाठी ताज्या कोरफडीचा गर घ्या. नंतर त्याचे जेल तयार कराआणि आपल्या टाळूवर लावा. साधारण 15 मिनिटे हे जेल केसांवर असेच राहू द्या आणि नंतर शॅम्पू करा.
हर्बल लिफ्स
तुम्ही केसांना रोझमेरीचे पाणी देखील लावू शकता. यासाठी बाजारातून रोजमेरीते पान आणून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. आणि सकाळी तेच पाणी गॅसवर 5 मिनिटे उकळण्यासाठी मंद आचेवर ठेवा. आता पाणी थंड झाल्यावर ते एका बाटलीत ठेवा आणि केसांना लावा. यामुळे तुमचे केसही सॉफ्ट होतील. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की हे पाणी एक आठवड्यापेक्षा जास्त काळ वापरू नका. जर हे पाणी एका आठवड्यापेक्षा जास्त असेल तर ते पुन्हा नवीन बनवा म्हणजेच ते पाणी एका आठवड्यापेक्षा जास्त काळ वापरू नका.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Health Tips : हिवाळ्यात ज्यूस पिणं आरोग्यदायी आहे का? आयुर्वेदात काय म्हटलंय? वाचा सविस्तर